Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, १५ जून, २०१९

*(TG24 ) मराठी मध्ये पाहा TOP TEN हेडलाईन्स दि : - 14-06-2019*


*आजच्या दिवसभरातील ताज्या घडामोडी. दि : -13-06-2019/ 14-06-2019*




०१) उदयनराजे हे स्वयंघोषीत छत्रपती, असे बरेच आमदार मी उरावर घेतले आहेत - रामराजे निंबाळकर, तर रामराजेंना मतदारसंघातून जोडे मारून हाकलून दिले पाहिजे - रणजितसिंह नाईक निंबाळकर.  


०२) इनाम जमिनीची कथित बेकायदा खरेदी प्रकरणी राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडेंना दिलासा, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती.


०३) सांगली जिल्हा बँकेची 25 लाखांची रोकड लुटली, चौघा चोरट्यांनी बँक कर्मचाऱ्यांचा पाठलाग करून डोळ्यात चटणी टाकून रोकड केली लंपास.    


०४) कोलकात्यातील डॉक्टर मारहाणीच्या निषेधार्थ देशभरातील निवासी डॉक्टरांचा संप, कोलकात्यात 80 डॉक्टरांचा राजीनामा तर राज्यभरात विविध ठिकाणी निदर्शने.  


०५) नाशिकमध्ये दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा, गोळीबार करत लूटमार, मुथूट फायनान्सच्या कार्यालयातील हल्ल्यात एकाचा मृत्यू. 


०६) विद्युत साहित्य पुरवठ्यावरून सांगली महापालिका सभेत वादंग, नगरसेवकाकडून प्रशासन धारेवर तर डॉ नर्गिस सय्यद यांनी काढले आरोग्य यंत्रणेचे वाभाडे.   


०७) सांगली महापालिकेच्या महासभेत ड्रेनेज आणि अमृत योजनेवरून प्रशासन धारेवर, चौकशी करून अहवाल सादर करण्याचे महापौरांचे आदेश.


०८) काँग्रेसच्या विधीमंडळ गटनेतेपदी बाळासाहेब थोरात यांची निवड, तर विधानसभा गटनेतेपदी विजय वडेट्टीवार.


०९) राज्यातील हज यात्रेकरूना मोठा दिलासा, आता घरातून होणार ऑनलाईन रिपोर्टिंग, मुंबईत तीन दिवस राहण्याची गरज नाही - हज कमिटी अध्यक्ष जमाल सिद्दीकी.


१०) लेकराच्या दप्तराचं ओझं आईने मांडले कवितेत, तर बाबाने फाडलं नवंकोरं पुस्तक, सांगलीच्या बोर्डे दांपत्याची अनोखी शक्कल, 


११) इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडेच, शिवसैनिकांनी सज्ज व्हावे - उद्धव ठाकरे.


१२) अपार्टमेंटमध्ये घर देण्याचे स्वप्न दाखवून घर उद्ध्वस्त केल्याच्या निषेधार्थ दलित महासंघाच्या वतीने सांगली महापालिकेवर कोलांटी उडी घेत आंदोलन.


१३) सरकार कोणतेही असो, दुष्काळासमोर जाण्यासाठी तयारी करून शेतकऱ्यांना दिलासा देणे आवश्यक - उदयनराजे भोसले यांचे सोलापुरात वक्तव्य.  


१४) इनामी जमिनीच्या या बेकायदेशीर खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून धनंजय मुंडे यांच्यासह 14 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल.


१५) बीड जिल्हयासाठी 175 कोटीची योजना, एक शेतकरी एक रोहित्र योजनेचा शुभारंभ, पंकजा मुंडेंच्या हस्ते उदघाटन.


१६) जत मधील दुष्काळग्रस्तांची पायी दिंडी साताऱ्यात दाखल होताच खा. उदयनराजे भोसले यांनी पायी दिंडीला दिली भेट.


१७) उदयनराजेंना आवरा नाहीतर आम्ही बाहेर पडतो - ना. रामराजे निंबाळकर यांचा शरद पवारांना इशारा.


१८) वर्धा सेलू शहरातील पानटपरी आणि भाजी दुकानाला आग, हजारोंचे नुकसान, अज्ञात इसमाविरुध्द तक्रार दाखल.


१९) विद्यार्थी पट नोंदणीचे उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण करण्यासाठी सांगलीत शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे विविध उपक्रमांनी स्वागत.


२०) दारूबंदी असणाऱ्या वर्धा जिल्ह्यातून दारूसाठा जप्त, तीन कारवाईत लाखोंचा मुद्देमाल जप्त, समुद्रपूर पोलिसांची कारवाई.


२१) सांगली जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने जुनी पेन्शन ऐरणीवर आंदोलनाची दिशा ठरवणारी बैठक संपन्न,17 जून रोजी आझाद मैदानावर आंदोलनाचा निर्णय.


२२) भाजपला सत्ता चालवता येत नसेल तर सत्तेतून पायउतार व्हावे, आयुक्त हटाव ही भाजपची नौटंकी - ॲड. अमित शिंदे.


२३) कल्याणात नालेसफाईत ‘हात की सफाई’ - आमदाराचा आरोप, तर सत्ताधारी नेत्याचा चिखलफेक करण्याचा इशारा.


२४) इचलकरंजी येथील महात्मा गांधी पुतळा येथील अतिक्रमण नगरपरिषदेच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाने जेसीबीच्या सहाय्याने हटविले.


२५) शिराळा तालुक्यात सर्वञ दमदार पावसाची हजेरी, शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण.


२६) कोलकात्यातील डॉक्टरवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ काढलेल्या संपामध्ये सांगलीतील 450 डॉक्टर सहभागी, शासकीय रुग्णालयाबाहेर केली निदर्शने.


२७) पलुस आमणापूर येथे शिरवळकर फडाच्या वतीने श्रीज्ञानेश्वरी पारायण सोहळा उत्साहात संपन्न.


२८) चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीला चार वर्ष उलटूनही अद्याप दारू बंद नाही, शहरातील ढाब्यावर खुलेआम विक्री सुरू, प्रशासनाचे दुर्लक्ष.


२९) ग्रामीण विद्यार्थीनी सायकल बँकेच्या माध्यमातून संत सावतामाळी विद्यालयातील विद्यार्थिनींना सायकलीचे वाटप.


३०) वर्धा समुद्रपूर येथे नगर पंचायतीचा पाण्याचा टँकर पलटी, एक जण जखमी. 


३१) सांगली महापालिकेच्या कामगार सभेकडून कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महापालिका मुख्यालयासमोर ठिय्या आंदोलन.


३२) सांगलीच्या कृष्णा नदीपात्रात अज्ञात तरुणीची आत्महत्या, कारण अस्पष्ट.


३३) रायगडावर जेष्ठ शुद्ध त्रयोदशी या तिथीप्रमाणे होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा शुभारंभ.


३४) शिराळा शेडगेवाडी खुजगाव येथील मेणी जलसेतुच्या गळतीमुळे मुख्य रस्त्याचा भराव गेला वाहुन, वाहनधारकांना करावी लागत आहे जीवघेणी कसरत.


३५) मिरज शासकीय रुग्णालयात 4 डायलेसिस मशीन व वॉटर एटीएम मशिनचे उद्घाटन संपन्न.


३६) विद्यार्थ्यांनी प्रत्येक संकटावर मात केली पाहिजे, तसेच स्पर्धा परीक्षा, उद्योग या क्षेत्राकडे वळले पाहिजे - इचलकरंजी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश मोरे.


३७) नागरिकांवर 8 कोटींचा बोजा पडणार असल्याने इचलकरंजी नगरपालिकेने सर्व विकास कामांच्या फेर निविदा मागवण्याची कॉँग्रेस नगरसेवक शशांक बावचकर यांची मागणी.


३८) अमृतांनद स्वामी लहान वयातच डॉक्टर पदवीने सन्मानित म्हणजेच त्यांचे कार्य कौतुकास्पद - ज्ञानयोगी श्री.सिध्देश्वर स्वामीजी यांचे जत येथे वक्तव्य.


३९) कलकत्ता येथे दोन डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी अमरावती धामनगावात आयएमए संघटनेच्या वतीने निषेध.


४०) कलकत्ता येथे डॉक्टरांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ यवतमाळ मधील डॉक्टरांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून केला निषेध.


४१) यवतमाळ दारव्हा तहसील कार्यालयात मध्यरात्री आग, शासकीय दस्ताऐवज जळून खाक.


४२) इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयाच्या हस्तांतरणामध्ये शासनाची फसवणूक, नगराध्यक्षांसह अधिकाऱ्यांवर कारवाईची सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी. 


४३) जमिनीचा मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्यांनी यवतमाळमध्ये नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महार्गाचे काम बंद करून सरकार विरोधात केली घोषणा बाजी.


४४) वर्ध्यात पहायला मिळाली खाकीतली माणूसकी, वाहतूक पोलिसांनी वृद्धाला मार्ग काढुन देत दिला आधार.


४५) अतिक्रमण धारकांना कायम स्वरूपी पट्टे देण्याच्या मागणीसाठी माजी आ. राजु तिमांडे यांची वर्धा समुद्रपूर तहसिल कार्यालयावर धडक.


४६) अवैध दारू विक्री विरोधात वर्धा गिरड पोलिसांची धडक कारवाई, दोन घरात छापा टाकत देशी दारू जप्त करत दोन आरोपींना केली अटक.


४७) आजऱ्यात चोरट्यांचा वावर वाढला, सीसीटीव्हीचा डोळा कधी उघडणार? आजरेकरांना प्रश्न.


४८) चंद्रपूर बाबूपेठ भागातील सिटी शाळा परिसरात माकडांचा उच्छाद, 7 ते 8 जणांचा चावा घेऊन केले जखमी.


४९) धनंजय मुंडेंना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा,  बीड परळीमध्ये फटाके फोडुन, पेढे वाटुन जल्लोष साजरा.


५०) सांगली महापालिका आरोग्य कर्मचाऱ्यांना वन डे पेमेंट द्या - नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांची मागणी.


५१) बुलडाण्यात नागपूर-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, दोन जण जागीच ठार.


५२) बुलडाणा चिखलीच्या आठवडी बाजारात लागली आग, 5 किराणा दुकान जळाल्याने लाखोंचे नुकसान, जीवितहानी नाही.


५३) कोल्हापूर जिल्ह्यात पावसाला दमदार सुरुवात, शेतकरी सुखावला.


५४) कलकत्ता येथे डॉक्टरांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ नागपुरच्या शासकीय रुग्णालयाच्या डॉक्टरांनी अधिष्ठाता कार्यालयावर मोर्चा काढून केला निषेध.


५५) नागपूरात लकडगंज परिसरात भरदुपारी दरोडा, चाकुच्या धाकावर लाखोंची रक्‍कम लुटून केला पोबारा, चोवीस तासात पाचही आरोपींना अटक.


५६) वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे टिप्परला दुचाकीची धडक, युवक गंभीर जखमी.


५७) राज्यातील आश्रमशाळांचे कर्मचारी वेतन आयोगापासून वंचित.


५८) सांगली महापालिका नगरसेवकांच्या मानधनात वाढ करा - नगरसेवक सुबराव मद्रासी यांची महासभेत मागणी.


५९) कामेच होणार नसतील तर विषयपत्र कशासाठी आणता, जनतेला आम्ही काय उत्तर द्यायचे - अभिजीत भोसले यांचा सांगली महासभेत संतप्त सवाल.


६०) शिराळा तालुक्यातील चांदोली परीसरात ऊन पावसाचा खेळ सुरु, शेतकरी वर्ग आनंदित.


६१) अवैधरित्या  माती उत्खनन केल्याप्रकरणी मिरज म्हैसाळ गावामधील 24 जणावर गुन्हे दाखल, जिल्हाधिकाऱ्यांनी 5 कोटी रुपयांचा ठोठावला दंड.


*आपल्या लोकप्रिय( TG24 )मराठी या वृत्तवाहिनीवर जाहिरातीसाठी संपर्क साधा..9850486340/9403886340.*



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध