Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ४ फेब्रुवारी, २०२०

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना पनवेल.




मानधन व वाढीव थकबाकी तातडीने मिळणार, संघटनेच्या पाठपुराव्यानंतर प्रक्रीयेला वेगाने सुरुवात आज दि. 03 फेब्रुवारी 2020 रोजी मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच मा.ना. श्रीमती यशोमती ठाकूर, मंत्री, महिला व बालविकास, महाराष्ट्र राज्य यांची मंत्रालय मुंबई येथे आपल्या संघटनेच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.


नोव्हेंबर 2019 पासूनचे थकीत मानधन आणि ऑक्टोबर 2018 ते जुलै 2019 या कालावधीतील मानधनवाढीची थकीत रकमेचा मंजूर झालेला निधी विनाविलंब वितरित करून त्वरित मानधन अदा करण्यात यावे.दरमहा ५ तारखेपर्यंत मानधन अदा करण्यात यावे.

मा. उपमुख्यमंत्री अजित दादांनी याबाबत सर्व संबंधित अधिकारी यांना लगेचच सुचना दिल्या आणि अन्य मागण्या मंजूर करण्यासाठी सरकार सकारात्मक विचार करीत असल्याचेही शिष्टमंडळाला आश्वाशित केले. 

समान किमान कार्यक्रमामध्ये नियोजित केलेल्या मानधनवाढीचा विचारही येणाऱ्या काळात होईल याबाबत अजित दादांनी सांगितले.

थकीत मानधनाची रक्कम येत्या आठवड्याभरात बँक खात्यात जमा होईल. 
मानधनवाढीची थकीत रक्कम वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 

थकबाकीची रक्कमही त्वरित अदा करण्यात येईल. 

दरमहा नियमित ५ तारखेला मानधन मिळण्यासाठी उणे(-) बीडीस वर मानधन अदा करण्याबाबत मा. श्री. अजितदादा पवार, मंत्री वित्त व नियोजन विभाग यांच्याशी चर्चा करण्यात आली असून लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. असे मा.मंत्री ठाकुर मॅडम यांनी सांगितले.

शिष्टमंडळात मायाताई परमेश्वर, रामकृष्ण पाटील, युवराज बासाणे, सुधीर परमेश्वर यांचा समावेश होता...


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध