Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २२ मार्च, २०२१
Home
/
Unlabelled
/
भोईराज पंतसंस्थेच्या हस्ती बँकेच्या ८३ लाखांच्या भरणा पावत्याही बनावटच!! ही तर फरार मॅनेजर सुनील वाडीले आणि संचालक विजय महालेची कमाल
भोईराज पंतसंस्थेच्या हस्ती बँकेच्या ८३ लाखांच्या भरणा पावत्याही बनावटच!! ही तर फरार मॅनेजर सुनील वाडीले आणि संचालक विजय महालेची कमाल
शिंदखेडा दि.२२ (प्रतिनिधी) शिंदखेडा शहरातील भोईराज ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे मॅनेजर सुनील पुना वाडीले हा अचानक दि.१३ जानेवारी २१ पासून भोईराज पतसंस्थेच्या ऑफिसमध्ये येणे बंद झाले म्हणून ते फरार झाले असल्याचा कयास संचालक मंडळाने लावला असतानाच विशेष लेखापरीक्षण अधिकारी तथा भोईराज ग्रामीण पतसंस्थेचे प्राधिकृत चौकशी अधिकारी ॲड.एस.एन. जाधव यांनी दि.१२ जानेवारी २१ रोजी सुनावणी ठेवली होती. या सुनावणीत देखील पतसंस्थेचे मॅनेजर सुनील वाडीले व विद्यमान संचालक विजय महाले हे हजर झाले नाहीत, परंतु भोईराज पतसंस्थेच्या गैरव्यवहारात अनेक प्रकारे मॅनेजरने केलेले भ्रष्ट व्यवहार आता चव्हाट्यावर येऊ लागले आहेत.
दरम्यान शहरातील बँका, राष्ट्रीयीकृत बँका यांना देखील बनावट पावत्यांच्या माध्यमातून या महाठगाने सोडलेले नसल्याचे दिसून येत आहे. याचे चांगले उदाहरण म्हणजे शहरातील नामांकित दि हस्ती को ऑपरेटिव्ह बँकेच्या शिंदखेडा शाखेच्या सुमारे ८३ लाखांच्या भरणा पावत्या बनावट दाखवून प्राधिकृत चौकशी अधिकाऱ्यांशी बनवाबनवी केल्याचे उघड झाले आहे.
शिंदखेडा शहरातील गोरगरीब जनतेसाठी खऱ्या अर्थाने दुवा ठरणारी सातत्याने गेल्या वीस वर्षापासून कर्जदार ठेवीदार यांच्यासाठी विश्वासास पात्र ठरणारी ही पतसंस्था आता पूर्णपणे या महाठगाने डबघाईस आणली आहे. याला कारण पतसंस्थेचे मॅनेजर सुनील वाडीले व विद्यमान संचालक विजय महाले ही जोडी असल्याचे सिद्ध झाले आहे. याच संस्थेच्या संचालक मंडळात महाठगाचा भाऊ देखील संचालक आहे. शिंदखेडा शहरातील राजकारणात देखील या दोघांनी चांगला जम बसवून तो स्वीकृत नगरसेवक पदावर जाऊन बसला होता. एका राजकिय पक्षाच्या जीवावर अन् भोई समाजाच्या पाठींब्यावर हा स्थानिक राजकारणात देखील भाग घेत होता. स्वत:ला एक बलशाली समजणारा हा महाठग आपण ज्या समाजात जन्मलो त्या समाजाची फसवणूक करण्यास हा महाभाग विसरलेला नाही एवढे मात्र खरे!!
विशेष लेखापरीक्षणात या संस्थेचे मॅनेजर सुनील वाडीले व संचालक विजय महाले यांना दि.२ डिसेंबर २०२० या दिवशीच झालेल्या भ्रष्टाचाराच्या अफरातफर प्रकरणात कलम ८८ खाली चौकशी करणे कामी अॅड. एस.एन.जाधव यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून शासनाने नेमणूक केली होती. त्यादिवशी यात महाठगाने पंधरा दिवसांची मुदत मागून दि.१८ डिसेंबर रोजी पुन्हा सुनावणी ठेवण्यात आली होती.
या काळात देखील संचालक मंडळाला अनभिज्ञ ठेवण्यात आले होते. त्यादिवशी संस्थेतर्फे मॅनेजर हजर झालेत व पुन्हा सुनावणीची तारीख घेऊन दि.८ जानेवारी २१ रोजी देण्यात आली. या दिवशी मॅनेजरवर दबाव वाढल्याने लेखी खुलासा देऊन चौकशी कामातील रक्कम सुमारे ६३ लाख ८ ते १० दिवसात वसूल करुन देतो असे सांगुन संस्थेत ८३ लाखांचे चेक प्राप्त झाले आहेत. तेव्हा एक महिन्याची चौकशीची मुदत द्यावी अशी लेखी विनंती केली आहे. त्यानुसार पुन्हा दि.१२ जानेवारी २१ रोजी सुनावणीची तारीख देण्यात आली होती.परंतु या काळातही संचालक मंडळ अनभिज्ञ होते व मॅनेजर त्या दिवसापासून गायब झाले आहेत. (सविस्तर भाग वाचा पुढच्या अंकात)
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटना, नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने धुळे लोकसभा मतदारसंघाच्या मा. खासदार डॉ. शोभाताई ब...
-
नाशिक : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटना, नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे माननीय खासदार भास्कर मु...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा