Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ८ ऑगस्ट, २०२६

वणीत भूकंपाचे सौम्य हादरे; सुदैवाने कोणतीही जीवित अथवा वित्तहानी नाही.


संदीप अवधूत :-
वणी : शहर व परिसरात शनिवारी रात्री भूकंपाचे सौम्य हादरे जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. अचानक जाणवलेल्या कंपामुळे काही नागरिक घराबाहेर पडले.
भूकंपाचा धक्का अल्पकाळ जाणवला असून, सुदैवाने वणी शहरात कोणतीही जीवितहानी किंवा मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याचे प्राथमिक वृत्त नाही. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील काही भागांतही भूकंपाचे धक्के जाणवल्याच्या नोंदी समोर आल्या असून, भूकंपाची तीव्रता व केंद्रबिंदूबाबत अधिकृत यंत्रणांकडून माहिती घेतली जात आहे.
वणीतील परिस्थितीवर प्रशासन व संबंधित यंत्रणांचे लक्ष असून, अधिकृत अहवालानंतर भूकंपाची तीव्रता व केंद्रबिंदूबाबत अधिक स्पष्ट माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध