Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ३ नोव्हेंबर, २०२६

बोगस शिक्षक भरतीचे आरोप असलेल्या संस्थेवर प्रशासक नेमण्याची मागणी शाळा सरकारने ताब्यात घ्याव्यात



बातमी विशेष :- ज्या शाळांमध्ये बोगस बॅक डेट शिक्षक भरती करण्यात आली असून, ज्या शाळेचे अध्यक्ष, सचिव आणि मुख्याध्यापक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशा सर्व शाळा राज्य शासनाने ताब्यात घेऊन त्यावर प्रशासक नेमावा, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.

मागणीची प्रमुख कारणे :

▪️१. शासनाची फसवणूक : संस्थेतील शिक्षकांचे वेतन राज्य सरकार करते. असे असताना काही संस्था चालक, सचिव आणि मुख्याध्यापकांनी बनावट कागदपत्रे शिक्षण विभागाकडे सादर करून शासनाची फसवणूक केली.

▪️२. कोट्यवधींचा अपहार : या बनावट भरतीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची पगाराची रक्कम व फरक बिलाची रक्कम लाटण्यात आली आहे.

▪️३. कारवाईची मागणी : फसवणूक करणारे संस्था चालक, सचिव आणि मुख्याध्यापक यांना तात्काळ अटक करावी.

▪️४. मुख्याध्यापक पदावरून हटवावे : दोषी मुख्याध्यापकांची सेवा समाप्त करून त्यांच्या जागी त्याच शाळेतील ज्येष्ठ व पात्र शिक्षकाकडे मुख्याध्यापक पदाचा पदभार द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

या प्रकारामुळे शिक्षण क्षेत्र बदनाम होत असून, शासनाने कठोर पाऊल उचलावे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध