Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १८ एप्रिल, २०२०
Home
/
Unlabelled
/
प्रा.कुंदन देवरे यांचा उपक्रम ऑनलाईन क्लासद्वारा साधता आहेत विद्यार्थ्यांशी संवाद
प्रा.कुंदन देवरे यांचा उपक्रम ऑनलाईन क्लासद्वारा साधता आहेत विद्यार्थ्यांशी संवाद
धुळे प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशभरात लोकडाऊन करण्यात आले आहे, त्यामुळे सगळ्या शाळा, कॉलेज, शिकवण्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी नगाव येथील गंगामाई कॉलेज ऑफ फार्मसी चे प्रा. कुंदन हेमंत देवरे यांनी गुगल क्लासरूम व व्हॉट्स ऍप ची मदत घेत पावर पॉइंट प्रेझेंटेशन, विविध अभ्यासक्रमाच्या लिंक ऑनलाईन परीक्षा आदी पद्धतीने अभ्यासक्रम पूर्ण करीत आहेत.
प्रा. देवरे हे तृतीय वर्ष बी फार्मसीच्या वर्गाला क्वालिटी अश्यूरंस हा विषय शिकवतात. तसेच भारत सरकारच्या स्वयम् पोर्टल तसेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गायझेशन च्या वतीने मोफत सर्टिफिकेट कोर्स राबविले जात आहेत त्याचा लाभ ते स्वतःही घेत आहेत व विद्यार्थ्यांकडून ही मार्गदर्शन करीत करवून घेत आहेत.
तसेच विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीस चालना मिळावी या उद्देशाने ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत संवाद साधून संशोधन लेख तयार करवून घेत आहेत. प्रा. देवरे यांचा प्रिव्हेन्टीव्ह अँड कंट्रोल ऑफ नोवेल कोरोना व्हायरस डिसीज (COVID-19) हा लेख IJAR मध्ये प्रसारित होत आहे, ज्याचा इमॅक्ट फॅक्टर 6.03 असल्याची माहिती त्यांनी दिली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा