Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २४ एप्रिल, २०२०
Home
/
Unlabelled
/
बेटावद येथे मश्जिदीत सामाईक नमाज पठण करणाऱ्यांविरूध्द नरडाणा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेटावद येथे मश्जिदीत सामाईक नमाज पठण करणाऱ्यांविरूध्द नरडाणा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नरडाणा:बेटावद येथे मश्जिदीत सामाईक नमाज पठण करणाऱ्यांविरूध्द नरडाणा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नरडाणा पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीत म्हटले की,राज्यात संचारबंदी असल्याने साथ रोग प्रतिबंधक कायदा धुळे जिल्ह्यात लागु करण्यात आला आहे.
दि २३ रोजी सायंकाळी नरडाणा पोलीस स्टेशनचे पो कॉ निलेश पाटील,पो कॉ एल व्ही चौधरी,पो कॉ सचिन वाघ व पो कॉ गोरख चौधरी आदी जण गस्त घालण्यासाठी बेटावद येथे गेले होते.गस्त घालत असतांना त्यांना बेटावद येथील मदीना जामा मश्जिद येथे सामाईक नमाज पठाण सुरु असल्याची माहिती मिळाली. त्या माहिती वरून पोलीस कर्मचारी मश्जिदीच्या बाहेर पटांगणावर थांबले. यावेळी नमाज पठण करून ६ ईसम मास्क न घालता बाहेर आले.
पोलिसांनी त्यांची विचारपूस केली व नरडाणा पोलीस स्टेशन येथे पो कॉ निलेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ६ जणांविरुद्ध भांदवी कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा