Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २६ डिसेंबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
राष्ट्रवादी कॉग्रेस चे जेस्ट नेते जयंत पाटील यांचा विधानसभेतील आदिवेशनातून निलंबन केल्याचा विरोधात* *धुळे जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेसचा वतींने जाहीर निषेध व निवेदन देण्यात आले
राष्ट्रवादी कॉग्रेस चे जेस्ट नेते जयंत पाटील यांचा विधानसभेतील आदिवेशनातून निलंबन केल्याचा विरोधात* *धुळे जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेसचा वतींने जाहीर निषेध व निवेदन देण्यात आले
संसदीय मार्गाने विचार मांडणारे संयमी नेतृत्व, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष,माननीय आमदार,श्री.जयंतरावजी पाटील साहेब यांचे नागपुर येथील हिवाळी अधिवेशनात केलेले निलंबन म्हणजे लोकशाहीची थट्टा करण्यासारखे आहे सातत्याने विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचे काम हे घटनाबाह्य असलेले मिंधे व ईडी सरकार करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार श्री.जयंतराव पाटील साहेबांनी हिवाळी अधिवेशनात बोलू नये, शेतकरी, कष्टकरी व सामान्य जनतेचे प्रश्न विधानसभेत मांडू नयेत तसेच मुख्यमंत्र्यांवर झालेल्या भूखंडाच्या आरोपांवरील व बेळगाव सीमावादावरील लक्ष्य विचलित करण्याच्या हेतूने सत्ताधाऱ्यांच्या आग्रहाखातर अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले आहे,अशा मिंधे व ईडी सरकाराचा आम्ही धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी जाहीर निषेध करीत आहोत.
दोंडाईचा ता.शिंदखेडा येथे माजी मंत्री नानासो. डॉ.हेमंतराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली व धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष श्री.जितेंद्र मराठे व धुळे जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते श्री.पोपटराव सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी 10:00 वाजता आंदोलन करण्यात आले व नायब तहसीलदार सो.यांना निवेदन देण्यात आले तसेच साक्री येथील तहसील कार्यालयात धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष श्री.जितेंद्र मराठे यांच्या नेतृत्वाखाली व धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस प्रा.नरेंद्र तोरवणे यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी 12:00 वाजता आंदोलन करण्यात आले व नायब तहसीलदार सो.यांना निवेदन देण्यात आले.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा