Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १५ नोव्हेंबर, २०२६
अमळनेर येथे धरतीआबा भगवान बिरसा मुंडा यांची १५१ वी जयंती उत्साहात साजरी,*
अमळनेर:- क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त लोक संघर्ष मोर्चा, आदिवासी पारधी विकास परिषद, आदिवासी पारधी क्रांती संघटना आणि एकलव्य संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने अमळनेर येथील नगरपालिका शेजारील क्रांतीवीर समशेरसिंग पारधी स्मारक ठिकाणी अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते,
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवर व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले, यावेळी वक्त्यांनी बिरसा मुंडा यांच्या 'उलगुलान' क्रांतीचा इतिहास आणि जल, जंगल, जमिनीच्या हक्कांसाठी त्यांनी दिलेल्या लढ्याची माहिती उपस्थितांना दिली, तसेच आदिवासी व पारधी समाजाच्या प्रलंबित मागण्या, शिक्षण आणि विकासाच्या प्रश्नांवर संघटित राहण्याचे आवाहन करण्यात आले,
या कार्यक्रमाला लोक संघर्ष मोर्चा, आदिवासी पारधी विकास परिषद, आदिवासी पारधी क्रांती संघटना, एकलव्य संघटनेचे पन्नालाल मावळे, मधुकर चव्हाण, प्रकाश पारधी, धनराज पारधी, अविनाश पवार, गणेश चव्हाण, राजा सोनवणे, गुलाब बोरसे, नरेश चव्हाण, धनराज मालचे, आनंद पवार, रावसाहेब पवार, यश दाभाडे, दिनेश पारधी, दिपक पारधी रमेश लोंढे, पप्पू लोंढे सह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि
समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अभिवादन कार्यक्रम चालू असतांना अमळनेर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष श्री प्रशांत निकम सह नगरसेवक पंकज चौधरी, नगरसेवक नाविद शेख, सामाजिक कार्यकर्ते भावेश जैन, पांडू भोई, राहूल कंजर सह पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट देत धरतीआबा भगवान बिरसा मुंडा यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
*धरतीआबा भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त संपूर्ण भारतात "जनजाती गौरव" दिवस साजरा करण्यात येत आहे परंतु अमळनेरात दरवर्षी १५ नोव्हेंबर रोजी लोक संघर्ष मोर्चा व आदिवासी पारधी विकास परिषदेतर्फे भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात येते.*
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर :- क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त लोक संघर्ष मोर्चा, आदिवासी पारधी विकास परिषद, आदिवासी पारधी क्रा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा