Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २८ जून, २०१९

जि प प्राथमीक शाळा नंबर 2 केर्‍हाळे बु येथे 26 जून सामाजिक न्याय दिन उत्साहात साजरा



रावेर दि. २८ (प्रतिनिंधी ) अजीज शेख  तालुक्यातील के-हाळे बु.येथील जि.प. प्राथमिक शाळा नं. २ दि. २६ जून राजश्री शाहू महाराज यांचा जन्मदिवस म्हणून प्रतिवर्षी सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी जनजागृती करण्यासाठी गावातून सकाळी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले शाळेत सर्वप्रथम राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन श्री योगेश पाटील सर यांनी केले विद्यार्थ्यांना राजश्री शाहू महाराजांच्या जीवन चरित्र विषयी शाळेचे मुख्याध्यापक श्री रवींद्र तायडे यांनी सखोल मार्गदर्शन केले .

       तसेच शाळेत विविध कला व क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले त्यात निबंध व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली विजयी स्पर्धकांना पेन बक्षीस म्हणून देण्यात आली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे उपशिक्षक श्री मधुकर निळे श्री शांताराम विचवे श्री दिलीप सावळे यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध