याचे डोस राजकारणी वारंवार पत्रकारांना पाजत असतात.समाजाच्याही पत्रकारांकडून खंडीभर अपेक्षा असतात..पत्रकारांनी तटस्थ,निःपक्ष असलं पाहिजे इथपासून पत्रकारांनी पित पत्रकारितेपासून दूर राहिलं पाहिजे,व्रत समजून पत्रकारिता केली पाहिजे,सत्य आणि वस्तुनिष्ठच बातम्या दिल्या पाहिजेत,सामांन्यांना न्याय मिळवून देताना परिणामाची पर्वा न करता लेखणी चालविली पाहिजे..वगैरे वगैरे..समाजाच्या या अपेक्षा चुकीच्या अजिबात नाहीत.पत्रकारिता करताना पत्रकारांनी ही सारी पथ्ये पाळलीच पाहिजेत याबद्दल दुमत असू शकत नाही.परंतू पत्रकारितेचं हे व्रत निभावताना काही हितसंबंधीयांकडून अनेकदा आडकाठ्या आणल्या जातात,पत्रकारांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न होतो,पत्रकारांच्या नोकर्यांवर गदा आणून पत्रकारांना रस्त्यावर आणण्याचे उद्योग होतात ,आणि हे सारं होऊनही पत्रकार भीक घालत नाही म्हटल्यावर त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जातात किंवा हल्ले केले जातात. महाराष्ट्रात दर पाच दिवसाला एका पत्रकारावर हल्ला होतो.(याची आकडेवारी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीकडे आहे...ती वेळोवेळी सरकारलाही सादर केलेली आहे.) पत्रकारांवर जेव्हा हल्ले होतात,त्यांचा विविध पध्दतीनं आवाज बंद करण्याचा जेव्हा प्रयत्न होतो तेव्हा पत्रकारांकडून ढिगभर अपेक्षा ठेवणार्या समाजाची प्रतिक्रिया किंवा भूमिका काय असते..? 'अनेकदा मला काय त्याचे'? हीच भूमिका बघायला मिळते.ज्या पत्रकारांवर हल्ले होतात ते सारेच पत्रकार बदमाश,हाप्तेखोर असतात असा समज समाजानं करून घेतला असेल आणि त्यामुळं समाज मौन बाळगत असेल तर ते चूक आहे.
Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १४ जून, २०१९
Home
/
Unlabelled
/
पत्रकारांकडून खंडीभर अपेक्षा ठेवणारा समाज पत्रकारांवर हल्ले होतात तेव्हा थंड का असतो पत्रकारांनी पत्रकारिता कशी करावी

Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा