Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २२ ऑगस्ट, २०२६
Home
/
/
कारसुळच्या पीएमश्री शाळा व ग्रामपंचायतीच्या विकासकामांनी गटविकास अधिकारी नम्रता जगताप भारावल्या.
कारसुळच्या पीएमश्री शाळा व ग्रामपंचायतीच्या विकासकामांनी गटविकास अधिकारी नम्रता जगताप भारावल्या.
बापू चव्हाण नाशिक :-
आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लिश डिजिटल प्राथमिक शाळा तसेच ग्रामपंचायत कार्यालयास निफाड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी नम्रता जगताप यांनी सदिच्छा भेट देऊन पाहणी केली. शाळेचा स्वच्छ,सुंदर व हिरवाईने नटलेला परिसर,वृक्षलागवड, डिजिटल सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. ग्रामपंचायत कार्यालयातील कामकाजाचीही त्यांनी पाहणी करून विविध विकासकामांची माहिती घेतली.
कारसुळची शाळा तालुक्यातील शैक्षणिकदृष्ट्या आदर्श ठरत असल्याचे सांगत, “तालुक्यातील एवढी सुंदर आणि सर्व सुविधांनी परिपूर्ण शाळा पाहून आनंद झाला,”अशा शब्दांत जगताप यांनी शाळेच्या कामकाजाचे कौतुक केले. शिक्षणासोबतच पर्यावरण संवर्धन, आधुनिक तंत्रज्ञान,स्वच्छता आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी शाळा व ग्रामपंचायतीकडून करण्यात येणारे प्रयत्न उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना नम्रता जगताप यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग व गोष्टी सांगून विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचे आवाहन केले. “परिस्थिती कोणतीही असो, शिक्षणाच्या बळावर माणूस मोठी उंची गाठू शकतो.विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करावा,स्वतःची ध्येये निश्चित करावीत आणि भविष्यात चांगले अधिकारी होण्याचे स्वप्न पाहावे,”असा संदेश त्यांनी दिला.
आजच्या डिजिटल युगात मोबाईल व टीव्हीच्या वाढत्या वापराबाबतही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.स्क्रीनचा वापर मर्यादित ठेवून पुस्तक वाचन, अभ्यास, मैदानी खेळ आणि सर्जनशील उपक्रमांना अधिक वेळ द्यावा, असे त्यांनी सांगितले. “मोबाईल तुमच्या हातात असावा; मोबाईलने तुमच्या आयुष्याचा ताबा घेऊ नये,”हा त्यांचा संदेश विद्यार्थ्यांच्या विशेष लक्षात राहिला.
शिष्यवृत्ती परीक्षेस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.तसेच विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, परीक्षेची भीती न बाळगता सातत्याने अभ्यास करावा आणि लहान वयापासूनच स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करण्याची सवय लावावी, असे आवाहन केले.त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह व आत्मविश्वास निर्माण झाला.
या प्रसंगी कादवा पाणी वापर संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब शंखपाळ,संचालक मधुकर ताकाटे, उपसरपंच शामराव शंखपाळ, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन वाघचौरे,उपाध्यक्ष तथा सदस्य देवेंद्र काजळे, ग्रामपंचायत अधिकारी विशाल सोनवणे,मुख्याध्यापक रमाकांत शिंदे,उपशिक्षक राजाभाऊ कदम, महेश कोर,प्रतिभा सावंत, कल्याणी वाशीकर,प्रीती चौधरी, पदवीधर शिक्षक संदीप बैरागी, वासुदेव पाटील,बालवाटिका शिक्षिका रोहिणी शंखपाळ यांच्यासह शिक्षकवृंद,विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
“शिक्षणाची गुणवत्ता, आधुनिक तंत्रज्ञान, पर्यावरण संवर्धन आणि संस्कारांची सांगड घालत कारसुळची पीएमश्री शाळा विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याची पायाभरणी करीत आहे. विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून अधिकारी होण्याचे ध्येय ठेवावे आणि स्पर्धा परीक्षांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.”
*नम्रता जगताप, गटविकास अधिकारी निफाड*
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा