Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १४ जून, २०१९

चक्क गावरान कोंबड्याचा पोल्ट्री फार्म वर्षा काठी कमावताहेत पाच कोटी





 बदलत्या हवामानानुसार पाऊस वेळेवर पडत नसल्या कारणाने शेकऱ्याला हंगामी काळात पिके घेता येईनात. त्यामुळे सिझनेबल पिके येत नाहीत व शेतकऱ्यांना उत्पन्न मिळेना प्रसंगी शेतकरी कर्जबाजारी होऊन शेती असूनही बेरोजगार होत चालल्याचे चित्र सध्याच्या काळात दिसत आहे. पण काही शेतकरी यालाही पर्याय शोधून शेतीला पूरक असा जोडधंदा करून मोठे उत्पन्न मिळून दुष्काळी संकटावर मात करत असल्याचे, भरघोस उत्पन्न मिळवत असल्याचे आपणास पाहावयास मिळते.असाच प्रकार अहमदनगर येथील अंकुश काकडे या शेतकऱ्यासोबत घडला. शेतीतून शेतीला लागणार वर्ष भराचा खर्चही न निघता आपण पूर्ण घाट्यात शेती करतोय असे जेव्हा अहमदनगर तालुका नेवासा गाव आंतरवली येथील अंकुश काकडे याच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी शेतीला पूरक असा व्यवसाय करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या तज्ज्ञांना माहिती विचारली.अनेक ठिकाणी फिरून शेतीला पूरक व्यवसाय करणारऱ्या शेतकऱ्याच्या सल्ल्याने एक नवा उपक्रम हाती घेण्याचे ठरवले .त्याकरिता त्यांनी कुकूट पालन करण्याचे ठरवले .मात्र इतरांप्रमाणे संकरित पोएट्री कुकूट पालन न करता देशी गावरान कोंबड्याच्या व्यवसाय करण्याचा निर्णय घेऊन मोठ्या मेहनतीने गावरान कोंबड्यांचा कुकूट पालन हा व्यवसाय सुरु केला. त्यांनी अनेक



शेतकऱ्यांचीही या कामात मदत घेतली.अंकुश कानडे याना हे करत असताना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागले. नंतर नियोजनबद्ध कामामुळे त्यांच्या या गावरान कुकूट पालनाला मोठा प्रतिसाद मिळू लागला. अंकुश कानडे इतर शेतकऱ्यांना कराराप्रमाणे आपल्या व्यवसायात सहभागी करून आपले मनुष्य बळ व व्यवसाय वाढवून आपला व्यवसाय हा एवढा मोठा केला कि या व्यवसायातून ते वर्षाकाठी पाच कोटी एवढे उत्पन्न मिळवू लागले.या व्यवसायातून त्यांनी स्वतःची कंपनी म्हणजेच गावरान कोंबड्याचे पिल्ले तयार करून ते बाजारात विकणे असा दोहेरी व्यवसाय सुरु केला. त्यांच्या व्यवसायाला कंपनीचे रूप मिळाले आहे . चैत्यने ग्रुप कानडे पोल्ट्री फार्म अंतरवली असे त्यांच्या कंपनीचे नाव आहे . कुकूट पालन याच बरोबर ते मच्छी पालन ,शेळी पालन हाही व्यवसाय ते करू लागले.तात्पर्य :- मनावर घेतले तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही .



हेच अंकुश कानडे यांच्या कार्यावरून समजते .तेव्हा शेतकऱ्यांनी न खचता शेतीला पूरक व्यवसाय केल्यास शेतकरीही कुठल्याही संकटावर मात मारू शकतो हेच आपल्याला समजते. अशाच प्रकारच्या तुम्हाला प्रेरणादायी ठरणाऱ्या माहिती देण्यासाठी आमच्या चायनलला लाईक व शेर करत रहा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध