प्रतिनिधी : शहीद कमांडो ज्योती प्रकाश
निराला हे ते वीर कमांडो होते. ज्यांनी काश्मीरच्या बांदीपोरामध्ये देशाच्या रक्षणासाठी दहशतवाद्यासोबत लढताना प्राण दिले. भारत मातेच्या या वीर जवानाने २ दहशतवाद्यांचा खात्मा केला. वीर गरुड कमांडो ज्योती प्रकाश निराला यांची बहिण शशिकला नुकतीच विवाह बंधनात अडकली. लग्नात भाऊ नव्हता. पण शहीद भावाच्या जागी १०० भाऊ उपस्थित होते.
आपल्या या बहिणीला या १०० भावांनी डोलीमध्ये बसवलं. गरुड कमांडो टीम शहीद ज्योती प्रकाश निराला यांच्या बहिणीच्या लग्नाला आवर्जुन उपस्थित होते. त्यांनी भावाची अनुपस्थिती या भावांनी जाणवू नाही दिली.शहीद ज्योती प्रकाश निराला यांची बहिण शशिकला यांचा विवाह बिहारच्या पाली रोड डेहरी येथे राहणाऱ्या सुजीत कुमारसोबत झाला. महत्त्वाचं म्हणजे, घरात एकमेव कमवता व्यक्ती असलेले शहीद ज्योती प्रकाश निराला यांच्या बहिणीच्या लग्नासाठी १०० जवानांनी ५ लाख रुपये जमा केले. कारण बहिणीच्या लग्नात काहीच कमी पडू नये.वाचा शहीद ज्योती प्रकाश निराला यांनी केलेला पराक्रम
तारीख होती १८ नोव्हेंबर २०१७ जम्मू कश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील चंदननगर गावात काही आतंकवादी असल्याची सूचना मिळाली होती. या आतंकवाद्यांच्या विरोधात मोहीम चालवण्याची जबाबदारी होता ती ‘राष्ट्रीय राइफल्स’ यांच्याकडे. ‘राष्ट्रीय राइफल्स’ या टुकड़ी मध्ये इंडियन एयरफोर्स चे गरुड कमांडोज देखील असतात गरुड कमांडो ही आपल्या हवाईदलाची एक तुकडी आहे. जी जमिनीवर सुरु असलेल्या ऑपरेशनला निष्कर्षांकडे नेते. २०१६ मध्ये जेव्हा पठानकोट एयरबेसवर हल्ला झाला होता तेव्हा ठरवल होत की भारतीय हवाईदलाची गरुड कमांडोज टुकड़ी राष्ट्रीय राइफल्स बरोबर अटैच राहील. जानेवारी २०१६ मध्ये हा निर्णय झाला होता. कश्मीरमध्ये जेव्हा आतंकवाद्यांच्या विरोधात ऑपरेशन होते, तेव्हा राष्ट्रीय राइफल्सच्या जवनांबरोबर गरुड कमांडोजची टीम ठिकाणावर पोहचली या तुकडीचे नेतृत्व करत होते ज्योति प्रकाश निराला.राष्ट्रीय राइफल्स आणि गरुड टुकड़ी बरोबर जेव्हा ज्योति प्रकाश निराला गावात पोहचले तेव्हा आतंकवादी एका घरात लपल्याची त्यांना सूचना मिळाली. आपल्या सैनिकांनी चारही बाजूने त्या घराला घेराव घातला. तर शूर ज्योती प्रकाश निराला घराच्या एकदम जवळ जाऊन आडोशाला उभा राहिले. आपल्या सैनिकांनी आतंकवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले मात्र तितक्यातच समोरून त्यांनी गोळीबार सुरु केला. याला आपल्याही सैनिकांनी चोख प्रतीत्युत्तर देत जोरदार गोळीबार सुरु केला. एवढ्यात गोळीबार करत सहा आतंकवादी घराच्या बाहेर पाळण्याचा प्रयत्न करू लागले. या दरम्यान आतंकवाद्यांची गोळी ज्योति प्रकाश निरालांना लागली. शूर निरालांनी तितकाच जोरदार प्रहार करत हाथगोळे आणि गोळ्यांनी आतंकवाद्यांवर एकच हल्ला चढवला आणि या महापराक्रमी शूर वीराने एकट्यानेच तीन आतंकवाद्यांना कंठस्नान घातल. यादरम्यान आतंकवाद्यांची ‘नापाक’ गोळी लागून
आपले हे शूर वीर ज्योति प्रकाश निराला शहीद झाले. श्रीनगरमध्ये झालेल्या या चकमकीत आतंकी मसूद अजहरचा भाचा तल्हा रशीद याला आपल्या सेनाने यमसदनी पाठवल.ज्योति प्रकाश निराला यांच्या बहादुरीचे किस्से राष्ट्रीय राइफल्स बरोबर इंडियन एयरफोर्स साठी एक मिसाल बनले आहेत. निरालांच्या शहीद झाल्यानंतर सरकारकडून त्यांना मरणोत्तर अशोक चक्र प्रदान करून सन्मानित करण्यात आल. निराला इंडियन एयरफोर्सचे पहिले सैनिक आहेत ज्यांना ग्राउंड ऑपरेशन साठी सन्मानित केल गेलं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा