Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, १७ जून, २०१९

जिल्हा क्रिडा प्रशिक्षण केंद्र, जिल्हा खो-खो संघटना व शिवशक्ती क्रिडा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या खो-खो प्रशिक्षण शिबिराचा शानदार समारोप



धुळे-प्रतिनिधी : येथील गरुड मैदानावर जिल्हा क्रिडा प्रशिक्षण केंद्र, जिल्हा खो-खो संघटना व शिवशक्ती क्रिडा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने दि. १ जुन ते दि. १५ जुन या काळात दररोज संध्याकाळी ५ ते ९ या वेळेत खो-खो प्रशिक्षण शिबिर घेण्यात येत होते. या खो-खो प्रशिक्षण शिबिराचा शानदार समारोप कार्यक्रम नुकताच जिल्हा क्रिडा अधिकारी सबनीस सोा. यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा खो-खो संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र महाले, तर प्रमुख अतिथी म्हणून क्रिडा अधिकारी बोथ्रीकर, हसमुख शहा, मगरे आप्पा, श्रीकांत अहिरराव, पंढरीनाथ बडगुजर, भरत ठाकूर, नरेंद्र चौधरी, अनिल संचेती, नितीन चव्हाण, गुरूदत्त चव्हाण, अहिरे मँडम, भावसार मँडम, शिरीष शर्मा, गिंदोडिया हायस्कुलचे मुख्याध्यापक बडगुजर, क्रिडा शिक्षक मनोहर चौधरी, आदि मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.

सदर प्रशिक्षण शिबिरास सुमारे ८० मुलां-मुलींनी सहभाग नोंदविला होता. प्रशिक्षण शिबिर निशुल्क होते. या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय खेळाडू आकाश पाटील, क्रिडा प्रशिक्षक गुरुदत्त चव्हाण, नितिन चव्हाण, पंढरीनाथ बडगुजर,  हसमुख शहा यांनी मार्गदर्शन केले व प्रशिक्षणार्थी खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपञ, टी शर्ट, नँपकीन, किट बँग आदिचे वाटप करण्यात आले. यासाठी शिवशक्ती क्रिडा मंडळाचे सहकार्य लाभले. समारोप कार्यक्रमात हिरे वैद्यकिय महाविद्यालयाचे डॉ. प्रशांत पाटील, यांनी खो-खो संघटनेला प्रथमोपचार किट उपलब्ध करुन दिले.  तसेच भविष्यात वेळोवेळी किटमधील बदलून देणार आहेत.या कार्यक्रमात जिल्हा क्रिडा अधिकारी सबनीस म्हणाले की, खेळामुळे तंदुरुस्ती, आत्मविश्वास वाढतो तसेच करियर घडू शकते. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडूंना शासकीय नोकरीत थेट प्राधान्य दिले जाते. त्यामुळे खेळाडूंनी खेेळाकडे लक्ष देवून करियर घडवावे तसेच असे शिबीर वारंवार राबवावे असे आवाहनही जिल्हा क्रिडा संघटनांना केले व त्यासाठी योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले.

कार्यक्रमांस खेळाडूसोबत पालकांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.त्यांच्यातील ऊत्साह वाखण्याजोगा होता. कार्यक्रम व शिबिर यशस्वितेसाठी जिल्हा क्रिडा प्रशिक्षण केंद्र, जिल्हा खो-खो संघटना व शिवशक्ती क्रिडा मंडळाच्या पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध