Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ३१ जुलै, २०१९
Home
/
Unlabelled
/
आरंभचे कार्य व त्यांचे उपक्रम येत्या काळात इतरांसाठी मार्गदर्शक बनतील- संजय बताले
आरंभचे कार्य व त्यांचे उपक्रम येत्या काळात इतरांसाठी मार्गदर्शक बनतील- संजय बताले
नळदुर्ग(प्रतिनिधी विशाल डुकरे ) येथील बालाघाट महाविद्यालयात
ग्रामीण भागातील तरुणांनी स्पर्धा परीक्षेच्या जगात उतरून समाज घडविण्यात महत्वाची भूमिका बजावली पाहिजे हा हेतू डोळ्यासमोर ठेऊन काम करणाऱ्या आरंभ शैक्षणिक व सामाजिक संस्था
विद्यार्थ्यांसाठी मोफत UPSC, MPSC व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आयोजन करण्यात आले होते. यापूर्वी शहरातील 11 गरीब होतकरू विद्यार्थ्यांना आरंभ बहुद्देशीय सामाजिक संस्थेने दत्तक घेतले आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांना या कार्यक्रमादरम्यान शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
प्रारंभी पाहुण्यांचे स्वागत वृक्ष देऊन पर्यावरण संरक्षनाचा संदेश देण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सचिन गायकवाड हे होते तर अध्यक्षस्थानी झाडे सर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून माजी पंचायत समिती सदस्य साहेबराव घुगे, जय हिंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय बताले, मुख्याध्यापक कदम सर, सामाजिक कार्यकर्ते विनायक अहंकारी, पद्माकर घोडके, राठोड सर हे होते.
यावेळी स्पर्धा परीक्षा संदर्भात बोलताना सचिन गायकवाड यांनी सांगितले की जर आपण इच्छाशक्ती व आत्मविश्वास अंगी बाळगून स्पर्धा परीक्षेची तयारी केली तर तुम्हाला यश हमखास मिळेल आणि आरंभ दत्तक घेईल त्या पाच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत शिकविण्यात येईल असे सांगितले. यावेळी साहेबराव घुगे, संजय बताले, विनायक अहंकारी, झाडे सर यांनी मनोगत व्यक्त केले तसेच प्रस्ताविक संस्थेचे सोशल मिडियाप्रमुख सुरज आवटे यांनी तर सूत्रसंचालन संतोष पवार यांनी केले आभार संस्थेचे सचिव श्रमिक पोतदार यांनी मानले. या उपक्रमाला समर्थ कॉम्प्युटर सेंटर चे संजय हजारे, अजिंक्य कलशेट्टी, ओंकार कुलकर्णी, सुमित यादगिरे यांनी मदत दिली, कार्यक्रम यशस्वीपणे पार
पाडण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष राहुल हजारे, सहसचिव अभय हजारे, उपाध्यक्ष विशाल डुकरे, प्रसिद्धी प्रमुख आयुब शेख, हरिदास बेले, कैलास घाटे, बबन चौधरी, शुभम हजारे, अनिल जाधवर यांनी प्रयत्न केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा