Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १० जुलै, २०१९

वृक्षारोपणापेक्षा वृक्षसंवर्धन ही काळाची गरज,,,,,, मा. मंचकजी इप्पर (IPS)


अहमदपूर प्रतिनिधी :(गजानन अनंतवाळ)

अहमदपूर येथील ज्ञानदीप मिल्ट्री पोलीस अकॅडमीमध्ये नव प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत व पत्रकार बंधूंचा सत्कार यानिमित्ताने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून ,अनिसचे मेघराज गायकवाड तर 

प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा.  श्री मंचकजी इप्पर (IPS) तर प्रमुख पाहुणे म्हणून एमडी राठोड, हरिदास तम्मेवर,  अजहर बागवान, गोविंद गिरी पुढे बोलताना इपर साहेब  म्हणाले की सध्याच्या काळात वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाली आहे  ते प्रथम थांबली पाहिजे झाल्यामुळे,  निसर्गाचा समतोल बिघडत चाललेला आहे ,येणारी पिढी निरोगी पाहिजेत असेल तर, वृक्ष 



लागवड व त्याचे संगोपन अति महत्वाचे आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांना वाटतं लोक काय म्हणतील याचा विचार न करता मला काहीतरी स्वतःला घडवायचं हे प्रबळ इच्छाशक्ती पाहिजे   मेहनतीतून यशाचे शिखर प्रत्येकाला गाठता येते सामाजिक बांधिलकी प्रत्येकाने जपली पाहिजे असे यशाचा पासवर्ड विद्यार्थ्यांना यावेळी दिला. अध्यक्षीय समारोपात मा. मेघराज 

गायकवाड म्हणाले वृक्ष लागवड करून आपल्या घरातील प्रिय व्यक्तीच्या नाव देऊन त्याचे संगोपन करा. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अकॅडमीचे संचालक उद्धवराव इप्पर यांनी अकादमीच्या सात वर्षाचा चढता आलेख विद्यार्थ्यांना यशाच्या 

शिखरावर नेण्याचा प्रमाणिक प्रयत्न आमचा आहे  तर येथील विशाल घुले गुंडे गंगा श्री विद्यार्थ्यांनी आपला अनुभव व अकडमी चे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले


 याप्रसंगी कार्यक्रमाला , मा. गजानन भुसारे, मा. वीरेंद्र पवार, मा. चंद्रशेखर भालेराव, , मा. फिरोज शेख, मा. चंद्रकांत शिंदे सर, मा. गोविंद काळे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे 

सूत्रसंचालन प्राध्यापक अमोल वाघमारे व आभार प्रदर्शन प्राध्यापक नर्सिंग पाटेवाड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेजर राम, मेजर जितेंद्र, बाबूजी, कदम सर, गुट्टे सर, महिला प्रशिक्षक पूजा कुमारी मॅडम व यावेळी मुली व मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध