Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १२ एप्रिल, २०२६

घोटी व वाडीव-हे परिसरातील अवैध हातभट्टीचे दारू अड्डयांवर स्थानिक गुन्हे शाखेचे छापे.





संदीप अवधूत :-

नाशिक जिल्हयातील अतिदुर्गम भागात डोंगर, द-यांमध्ये तसेच नदी, नाले, पाण्याचे डोह असलेल्या विविध ठिकाणांवर छूप्यारित्या सुरू असलेले हातभ‌ट्टीचे दारू अड्डयांवर कारवाई करण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील यांनी आदेश दिलेले आहे.त्यानुसार आज दि. १२/०४/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांचे पथकांनी घोटी पोलीस ठाणे हद्दीतील पिंपळगाव मोर डोंगराचे पायथ्याशी तसेच वाडीव-हे पोलीस ठाणे ह‌द्दीत मुळेगाव शिवातील डोंगर भागातील जंगलात अवैधरित्या सुरू असलेल्या हातभ‌ट्टीचे दारू अड्डयांवर छापे टाकून कारवाई केलेली आहे. सदर छाप्यामध्ये हातभ‌ट्टीची गावठी दारू तयार करण्यासाठी लागणरे रसायन, काळया रंगाचे गुळाची पावडर, तयार गावठी दारू तसेच इतर साहित्य साधने असा एकुण ५,५०,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. यातील आरोपी हे पोलीसांची चाहुल लागताच डोंगर द-यांमध्ये पळून गेले असून त्यांचेविरूध्द घोटी व वाडीव-हे पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (फ) (ख) (ड) प्रमाणे दोन गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे.अतिदुर्गम भागात हातभट्टीची गावठी दारू तयार करण्यासाठी नाल्यातील दुषित पाणी, नवसागर, बॅटरीचे जुने सेल, युरिया यांसह मानवी जीवनास अपायकारक असणा-या रासायनिक पदार्थांचा वापर केला जात असल्याचे आढळून आले आहे. जिल्हयात अशा प्रकारचे गावठी दारू हातभट्टीचे अड्डे आपल्या परिसरात सुरू असल्यास पोलीसांना तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन ग्रामीण पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, पोउनि सुदर्शन बोडके, पोउनि प्रकाश भालेराव, पोलीस अंमलदार प्रविण काकड, संदिप नागपुरे, सचिन धारणकर, संदिप कडाळे, रावसाहेब कांबळे, एकनाथ हळदे, नवनाथ शिरोळे, आबा पिसाळ, केतन कापसे यांचे पथकाने सदरची कारवाई केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध