Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
सनस्टार कंपनीस हिंदू सेवा संघाचा निर्वाणीचा इशारा ८ दिवसांत दुर्गधी बंद न केल्यास चिमणी उडवून देवू
सनस्टार कंपनीस हिंदू सेवा संघाचा निर्वाणीचा इशारा ८ दिवसांत दुर्गधी बंद न केल्यास चिमणी उडवून देवू
हिंदू सेवा संघ श्री . सुनिल सुर्यवंशी , शशिकांत चौधरी व मुकेश शेवाळे
करवंद ता . शिरपूर येथील सनस्टार कंपनीत मक्यावर प्रक्रिया करुन पावडर निर्मीती केली जाते . हया प्रक्रियेमुळे खुपच उग्र दुर्गंधी येते .त्यामुळे परिसरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे . लहान मुले तसेच वयस्क यांना श्वासोश्वासाचा त्रास होत आहे .डोकेदुखी ,चक्कर ,मळमळणे,उलटी होणे अशा अनेक प्रकारच्या शारीरिक व्याधींना नागरीक तोंड देत आहेत.आम्ही हे म्हणीत नाहीत की आपण कंपनीस टाळे ठोकावे.आमचे म्हणणे ऐवढेच आहे की दुर्गधी थांबविण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यात यावी.पण सदरील कंपनीविरुद्ध गेल्या एक दोन वर्षात नागरीकांनी निवेदन ,तकार अर्ज ,आदोलने केलीत पण कंपनीने वा सरकारी यंत्रणेने कोणतीही दखल घेतली नाही ,म्हणून हिंदू सेवा संघाच्या वतीने श्री .सुनिल सुर्यवंशी , शशिकांत चौधरी व मुकेश शेवाळे यांनी प्रशासनामार्फत कंपनीस८ दिवसांत कारवाई न केल्यास चिमणी उडवू असा निर्वाणीचा इशारा दिला आहे . सदरील निवेदन मा . श्री . विक्रमजी बादल , प्रांताधिकारी साहेब , शिरपूर व मा . श्री . हेमंतजी पाटील साहेब ,पोलिस निरिक्षक , शिरपूर पोलिस स्टेशन शिरपूर यांना देण्यात आले आहे .शिरपूर तालुक्यातील जनतेचा रोष पाहता कारवाई होईल अशी अपेक्षा केली जात आहे .
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
वणी/ प्रतिनिधी :- दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आय सि ए आय ) द्वारे घेण्यात आलेल्या 'सीए फाय...
-
जिवा भावाची मैत्री' या सामाजिक उपक्रमांतर्गत सुरगाणा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष उप पोलीस निरीक्षक मनोज कुव...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा