Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १८ जून, २०२६
विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस साजरा करून दिला सामाजिक बांधिलकीचा संदेश.
जिवा भावाची मैत्री' या सामाजिक उपक्रमांतर्गत सुरगाणा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष उप पोलीस निरीक्षक मनोज कुवर यांनी त्यांचा वाढदिवस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, करंजाळी (ता. सुरगाणा, जि. नाशिक) येथे विद्यार्थ्यांसोबत उत्साहात साजरा केला.
यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, चिवडा व सोनपापडीचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून कार्यक्रमाला विशेष रंगत आली. समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत वाढदिवस सामाजिक उपक्रमाद्वारे साजरा करण्याचा आदर्श यावेळी मनोज कुवर यांनी घालून दिला.
कार्यक्रमास 'जिवा भावाची मैत्री' ग्रुपचे अध्यक्ष वसंत बागुल , उपाध्यक्ष महेश धुम, तसेच सदस्य संजय चौधरी भाऊसाहेब , चिंतामण गवळी दिलीप गांगुर्डे, गणेश गावित, आलम शेख, सामाजिक कार्यकर्ते दिनेश चौरे उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक भरत पवार, उपशिक्षक अविनाश धुम व शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी मनोज कुवर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
वणी प्रतिनिधी - मुकेश लोढा वणी येथील वॉर्ड क्रमांक ४ मध्ये अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या भागात करण्यात आलेल्या गटार पाईपलाई...
-
नाशिक ( दिंडोरी ) : महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे भव्य राज्यस्तरीय अधिवेशन २० जून रोजी छत्रपती संभाजीनगर आदिती लॉन्स लाडगाव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा