Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २ मार्च, २०२०

वरवाडे संत सावता माळी भजनी मंडळ चे 55 वर्षे पूर्ण सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे


 
शिरपूर:प्रतिनिधी:श्री.संत सावता माळी भजनी मंडळ वरवाडे यास ५५ वर्षे पूर्ण झाल्याने दि.१/३/२०२० रोजी श्री. दोध्देश्वर महादेव मंदिर दहिवद येथे सुवर्ण महोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. सकाळी ८ ते १२ पर्यंत शिरपूर तालुक्यातील भजनी मंडळांनी भजनाचा आनंद घेतला.

त्यात वाघाडी, साकवद, शिंगावे, बाळदे, खर्दे, उंटावद, बलकुवा, वनावल, काकर्दे, थाळनेर,जैतपूर,सावळदे, दहिवद, वाठोडा, वासर्डी, जातोडा,अर्थे,भाटपुरा येथील भजनी मंडळ तसेच शिरपुरातील श्रीराम भजनी मंडळ,श्री.खंडेराव महाराज भजनी मंडळ,श्री.साईबाबा भजनी मंडळ, श्री.गुरुदत्त भजनी मंडळ चौधरी गल्ली, श्री.संकटमोचन हनुमान भजनी मंडळ वाल्मिकनगर,श्री.संत सावता माळी भजनी मंडळ वरचे गाव शिरपूर,श्री.संत सावता माळी भजनी मंडळ वरवाडे यांनी दररोज नित्यनियमाने हरीपाठ करणार्‍या महिला मंडळ वरवाडे या सर्व भजनी मंडळांनी व तालुका वारकरी सेवा मंडळाचे पदाधिकारी यांनीही सहभाग घेऊन धार्मिक वातावरणात भजनांचा आनंद घेतला.

नंतर सर्व भक्तगणांनी संत भोजनाचा आस्वाद घेतला. गावातील प्रतिष्ठित ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला ह.भ.प. जगदीश लहु माळी (महाराज), उमेश रमेश सोनवणे, गोपाल मच्छिद्र माळी, विक्की धनराज माळी, सागर गोपाल माळी,यश चुडामण माळी,  दगडू पांडुरंग माळी,भूषण ज्ञानेश्वर माळी, प्रकाश बापु पाटील,संतोष महारु माळी यांनी सुंदर रूप दिले.त्यात ह.भ.प.लक्ष्मण दगा माळी, अधिकार रामराव माळी, मोहन भटु माळी,नथा दामु माळी, छगन वंजी माळी, विक्रम उत्तम माळी, शिवाजी धुडकु माळी, पंढरीनाथ माळी, पुंडलिक धुडकु माळी, छबिलाल माळी,मन्साराम माळी, सुधाकर रामराव माळी,बापू श्यामा माळी, संतोष हिलाल माळी, विजय जगन्नाथ बागुल,भगवान शामराव माळी, महादू वजी माळी, प्रभाकर कुष्णा माळी, गौरव विनोद मोरे, मनोज परदेशी, दहिवद येथील कृष्णा कुंभार व भजनी मंडळ व संत सावता भजनी मंडळ वरचे गाव शिरपूर, हरिपाठ  महिला मंडळ वरवाडे यांनी अनमोल सहकार्य केले.

सूत्रसंचालन विजय बागुल यांनी केले. कार्यक्रमाचे मनोगत प्रमोद भोंगे, सुधाकर माळी, हेमराज राजपुत यांनी केले. श्री.संत सावता भजनी माळी मंडळ वरवाडे भक्त यांनी आभार मानले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध