Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ५ मार्च, २०२०

धुळे व नंदुरबार जिल्हा विधान परिषद निवडणुकीचे वाजले बिगुल.




                                                                                                               
शिरपूर:प्रतिनिधी                                    धुळे व नंदुरबार जिल्हा विधान परिषद सदस्य आ.अमरिशभाई पटेल यांनी मंगळवारी दि.१ ऑक्टोबर रोजी विधान परिषद सदस्य पदाचा राजीनामा देऊन भाजपा प्रवेश केल्याने रिक्त झालेल्या विधान परिषद सदस्य पदाचा निवडणुक कार्यक्रम मुख्य निवडणूक आयोगाने आज जाहीर केला.शिरपूरचे अमरीश भाई पटेल यांनी आपला सदस्य पदाच्या कालावधी अगोदर राजीनामा दिला होता. 

त्यामुळे धुळे नंदुरबार विधान परिषदेची मुदतपूर्व निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे.

धुळे नंदुरबार विधान परिषदेच्या रिक्त जागेसाठी १२ मार्च पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असून १३ मार्चला दाखल अर्जाची छाननी करण्यात येणार आहे.१६ मार्च रोजी माघारीची मुदत आहे.तर ३० मार्चला मतदान असून ३१ मार्चला मतमोजणी होणार आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध