Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ५ मार्च, २०२०

समाजसेवेच्या प्रवाहात समाजसेवकांनी सहभाग घ्यावा... श्री तुषार साटोटे




नाशिक प्रतिनिधी:भारत देश हा युवांचा देश म्हणुनही संबोधला जातो त्याचे मुख्य कारण म्हणजे आज देशात जेष्ठांच्या तुलनेत युवकांची संख्या अधिक आहे. त्याच तुलनेत भारतासह महाराष्ट्रात ही मोठ्या संख्येने भोई समाज हा आपल्या वास्तवास आहे.  


"महाराष्ट्रात असे कुठलेच गांव नसेल की तिथे भोई समाजाचे नाव नाही" परंतु तरीही भोई समाज हा आपल्या मुलभुत हक्कापासून, शासकिय मांगण्यापासुन आजही वंचित आहे. समाजाच्या आज अनेक समस्या,गरजा आहेत ज्या साध्या सोप्प्या असतांना ही त्या आपल्या समाजापर्यंत पोहचत नाहीत याचे कारण म्हणजे आपण आजही एकरुपतेच्या वाटेवर नाही किंवा ज्यांच्याकडुन ह्या गोष्टीं मिळवायच्या आहेत त्यांच्या नजरेत आपण बसत नाहीत आणि ते म्हणजे सरकार... ब-याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहीत आहेत कि, आपल्या सामाजिकपातळीवर पाहिजे त्या मिळत नाहीत किंवा त्या कशा मिळवायच्या? यासाठी भोई समाजातील जेष्ठ, वरीष्ठ ‌वर्ग, शासकिय कर्मचारी वर्ग आपणास मार्गदर्शन करण्यासही काही वेळा तयार होत आहेत परंतु पुढाकार घेण्यास कुणीही तयार होत नाही. 

अनेकांनी पुढाकारही घेतलेत परंतु त्यांना साथ ही काही प्रमाणात मिळाली नाही परंतु आज महाराष्ट्र राज्यातील "भोई समाज युवा मंच महाराष्ट्र" या युवा व्यासपीठावरुन आम्ही आपणास आवाहन करत आहोत की, महाराष्ट्रात भोई समाजाच्या सर्वांगीन विकासासाठी युवकांना सोबत घेऊन लढा देण्याचा निश्चय आम्ही करत आहोत. अनेक युवकांची साथ ही भोई समाज युवा मंचास मिळत आहे. मंचचे प्रमुख म्हणून श्री ज्ञानेश्वर खैरमोडे प्रदेशावर काम करत आहेत. शिक्षक बांधव श्री किशोर शिवदे, श्री चेतन मोरे, व्यावसायिक निलेशवाडिले, महारुशिवदे, कर्मचारीवर्ग निलेश शिवदे, राहुलजी भोई, जितेंद्रभोई, निलेशसाटोटे क्राईम ब्रान्च विभागातुन कार्य करत असलेले श्री मोरे अशा सर्व वर्गातुन युवावर्गाची साथ आम्हाला मिळत आहे 

तरी महाराष्ट्रातील तमाम भोई समाजातील युवकांना सोबत येण्याच आवाहन आम्ही करीत आहोत. युवकांसह अनेकांना प्रश्न ही पडतील की, भोई समाज युवामंचच का ?? तर भोई समाज युवामंच हे एक युवकांच, युवकांनी तयार केलेले, युवा व्यासपीठ आहे. इथे समाज उपयोगी, निस्वार्थ सेवेला विरोध नाही. सर्व समान असल्या कारणाने कुठलाही वाद नाही. इथे युवकांची चर्चा व त्यावर बहुमताने निर्णय झाल्यास तात्काळ अंबल बजावणी केली जात असते. जेष्ठांचे आशिर्वाद, वरीष्ठांचे मार्गदर्शन आणि शासकिय कर्मचारी यांची साथ या त्रिवेणी संगमातुन हा विडा आम्ही उचललेला आहे. 

तरी आपण जास्तीत जास्त संख्येने युवा संघटीकरण पर्वात म्हणजेच भोई समाज युवा मंच महाराष्ट्र या व्यासपिठास जोडून युवकाचे हात बळकट करावे ही आम्ही सामाजिक विनंती करत आहोत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध