Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २ मार्च, २०२०
अवजड वाहतुकीच्या विरोधात चाळीसगावकरांची एकजूट
चाळीसगाव (प्रतिनिधी) – आमदार मंगेश चव्हाण व भाजपा शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील यांच्यासह भाजपा पदाधिकारी यांनी दि.२८ रोजी रात्री शहरातून जाणाऱ्या अवजड व अनधिकृत वाहनांना अडवून आंदोलनाचा पवित्रा घेतला होता, त्यांच्या या प्रयत्नांचे सकारात्मक प्रतिसाद चाळीसगाव शहरात उमटत असून आज दुसऱ्या दिवशी देखील सर्वपक्षीय आंदोलकांनी रास्ता रोको करून संताप व्यक्त केला,
भाजपा शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, भाजपचे नगरसेवक राजेंद्र चौधरी, शिवसेनेचे भीमराव खलाने, पंचायत समिती सभापती अजय पाटील, भाजपा शहर उपाध्यक्ष सोमसिंग राजपूत, नगरसेवक रामचंद्र जाधव, नगरसेवक श्याम देशमुख राष्ट्रवादीचे प्रमोद पांडुरंग पाटील, राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष अमोल चौधरी, नगरसेवक भास्कर पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष भावेश कोठावदे ..इंदिरा काँग्रेसचे कैलास नाना पाटील,.नगरसेवक माना भाऊ राजपूत, नगरसेवक सोमसिंग आबा राजपूत,.तुषार चव्हाण, सरचिटणीस योगेश खंडेलवाल, भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे सुबोध वाघमारे, अरविंद गोत्रे , रोहन पाटीलं , तुषार गोत्रे, सचिन आव्हाड,यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत शहरातील अवजड वाहतुकीविरोधात रास्ता रोको आंदोलन केले.
यावेळी तहसीलदार अमोल मोरे यांनी सदर रात्रीची वाहतूक बंद व्हावी यासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला असून उद्याच तात्काळ पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन त्याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले. शहराच्या महत्वाच्या प्रश्नासाठी राजकारणाच्या पलिकडे जाऊन सर्वपक्षीय चाळीसगाववासीय एकत्र आल्याचे एक सकारात्मक चित्र यानिमित्ताने पाहायला मिळाले.
बायपास ची सुविधा असतानादेखील नियमांचे उल्लंघन करून चाळीसगाव शहरातून मोठमोठे अवजड वाहन रात्रभर होणारी वाहतूक यामुळे अनेक लोकांचे एक्सीडेंट मध्ये प्राण गेले आहेत आणि शहरातील रस्त्यांचीही नुकसान झाले आहे या अवजड वाहतुकीमुळे ठिकाणी खड्डे पडतात त्यामुळेही एक्सीडेंट होतात सुसाट वेगाने वाहने हे शहरातून जातात कोणत्याही जाणाऱ्या सामान्य नागरिकाचा विचार हे वाहनधारक करत नाहीत म्हणून यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यथा सर्व चाळीसगावकर व सर्वपक्षीय सर्वात मोठे आंदोलन होईल यात काही नुकसान झाल्यास प्रशासन जबाबदार राहील याची दखल लवकरात लवकर प्रशासन व पोलीस विभाग यांनी घ्यायची आहे घटनास्थळी तहसीलदार व नायब तहसीलदार यांनी भेट दिली यांच्या आश्वासनाने आंदोलन मागे घेण्यात आले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
वणी/ प्रतिनिधी :- दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आय सि ए आय ) द्वारे घेण्यात आलेल्या 'सीए फाय...
-
जिवा भावाची मैत्री' या सामाजिक उपक्रमांतर्गत सुरगाणा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष उप पोलीस निरीक्षक मनोज कुव...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा