Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २६ मार्च, २०२०
पाेलिसांनी काठीचा ‘प्रसाद’ देऊन तरुणांची हळदी-कुंकु लावून केली पूजा
जळगाव:प्रतिनिधी संचारबंदीत रस्त्यावर फिरु नका, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी करु नका अशा सूचना देऊन देखील बेजबाबदार नागरिक संचारबंदी झुगारुन बिनधास्तपणे रस्त्यावर फिरत अाहे.
पोलिसांनी बॅरिकेडिंग लावून रस्ते बंद केली तरी देखील आड मार्गावरुन शहरात येणाऱ्यावर बुधवारी पाेलिसांनी काठी उगारून त्यांना ‘प्रसाद’ दिला. तसेच इच्छादेवी चाैकात तरुणांची हळदी-कुंकु लावून पूजा केली. दरम्यान, स्थानिक पाेलिसाच्या मदतीला सीआरपीएफची एक तुकडी दाखल झाली अाहे
मंगळवारी रात्री लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर हजारो नागरिक किराणा, भाजीपाला, औषधी घेण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे बुधवारी रस्त्यावर गर्दी होणार नाही,अशी अपेक्षा होती; परंतु अनेकांनी पुन्हा-पुन्हा रस्त्यावर येऊन आपल्या बेपर्वाईचे दर्शन घडवले.
लॉकडाऊनमुळे संपूर्ण शहराला छावणीचे स्वरुप आले आहे. चौकाचौकात पोलिस कर्मचारी बंदोबस्तावर आहेत. पोलिसांना पाहून रस्ते बदलून लोक आडमार्गाने फिरत आहेत. मुख्य चौकात पोलिसांनी अडवल्यानंतर जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी बाहेर पडल्याचे कारण नागरिक सांगत आहेत. काहीजण विनाकारणही बाहेर निघत आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा