Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ३ एप्रिल, २०२०
Home
/
Unlabelled
/
कोरोना प्रतिबंधासाठी आमदार अनिल पाटील यांनी दिला अमळनेर तालुक्यासाठी 25 लाखांचा निधी लवकर साहित्य दाखल होणार
कोरोना प्रतिबंधासाठी आमदार अनिल पाटील यांनी दिला अमळनेर तालुक्यासाठी 25 लाखांचा निधी लवकर साहित्य दाखल होणार
प्रतिनिधी अमळनेर अमळनेर तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र चांगली सेवा देतील व कर्मचारी वर्ग सुरक्षित रहातील यासाठी कोविड 19 अर्थात कोरोना प्रतिबंधक साहित्य खरेदीसाठी 25 लाखांचा निधी आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला आहे. याबाबत ते पत्र जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांच्याकडे दिले आहे.व त्यास मंजुरी मिळून साहित्य लवकरच दाखल होत आहे.
राज्य शासनाने 'कोविड 19' अर्थात कोरानाच्या प्रतिबंधात्मक यंत्रसामुग्री व साहित्य खरेदीसाठी आमदार निधीतून खर्च करण्यास मुभा दिली आहे. याबाबतचा आदेश राज्य शासनाने काढला आहे. त्यामुळे जिल्ह्यास्तरावर आमदार निधीतून कोरोना संदर्भातील यंत्रसामुग्री खरेदी करता येणार आहे.
राज्य शासनाने एकवेळेची खास बाब म्हणून आमदार निधीतून अर्थात स्थानिक विकास निधीतून कोरोनाच्या प्रतिबंधात्मक यंत्रसामुग्री व साहित्य खरेदिसाठी खर्च करण्यास सहमती दिली होती त्या पार्श्वभूमीवर अमळनेर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय व नगरपालिका रुग्णालये यासाठी साहित्य खरेदी करण्यात येत आहेत.त्यासाठी आमदार अनिल पाटील यांनी आरोग्य विभागाची बैठक घेतली व त्यात अपूर्ण यंत्रसामग्री पूर्ण करुन प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, नगरपालिका रुग्णालय यासाठी हव्या असलेल्या साहित्याला तात्काळ मंजुरी देऊन त्याबाबत अंदाजपत्रक जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.
राज्य शासनाने प्रत्येक 'आमदार स्थानिक विकास कार्यक्रम' अंतर्गत २०१९-२०, २०२०-२१ करिता कोव्हीड १९ विषाणुमुळे उध्दभवलेल्या आपत्कालीन परीस्थितीतमध्ये जिल्हास्तरावर परिणामकारक प्रतिबंधात्मक कारवाई होण्याच्या दृष्टीने वैद्यकिय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदी करण्यासाठी आमदारांना ५० लाख पर्यंत निधी एक वेळेची विशेष बाब म्हणून उपलब्ध करुन देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. आमदारांनी यासाठी शिफारशी केल्यास जिल्हाधिकारी त्यास प्रशासकीय मान्यता देतील. त्या अनुषंगाने जिल्हास्तरीय कार्यालये यंत्रणांचे प्रमुख जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, महानगरपालिकेचे आयुक्त, नगरपालिकांचे मुख्याधिकारी हे वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदी करू शकतात.
या उपलब्ध निधीतून हे साहित्य उपलब्ध होणार आहे.
इन्फ्रारेड थर्मामिटर 18
पीपीई किट्स - 850
कोरोना टेस्टिंग किट्स माय लॅब 280
मास्क एन 95 - 1200
ट्रिपल लेयर फेस मास्क - 550
ग्लोज 7 नंबर - 4500
ग्लोज 7.5 नंबर - 4500
सॅनिटायझर 100 मिली - 1000
आयसोलेशन वॉर्ड - कॉटन बेस, पिलो बेडशीट, ब्लॅंकेट 700
ऑक्सिजन सिलेंडर किट - 6000
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर तालुक्यातील करवंद गावालगत असलेल्या सनस्टार कंपनीतून सातत्याने येणाऱ्या तीव्र व दुर्गंधीयुक्त वासामुळे परिसरातील ना...
-
शिरपूर प्रतिनिधी- शिरपूर तालुक्याच्या विकासात्मक कार्याचे तेजस्वी नेतृत्व करणारे सन्माननीय भाईसाहेब अमरीशजी पटेल व सन्माननीय भूपेशभाई पटेल, ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा