Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १० एप्रिल, २०२०
एरंडोल पोलिसांची धडक कार्यवाही ; गावठी दारूचे रसायन जप्त
जळगाव प्रतिनिधी : एरंडोल तालुक्यातील खेडी खुर्द येथे वसंत बुधा सोनवणे (वय-५० रा. खेडी खुर्द तालुका एरंडोल) हा ईसम गावठी हातभट्टी च्या दारु तयार करण्यास लागणारे व उपयुक्त असणारे गुळ,नवसागर,पाणी मिश्रीत व भट्टीच्या साधनां सह-भट्टी रचुन गावठी दारु पाडत आहे, अशी खात्रीशीर गुप्त बातमी मिळाल्याने त्याचेवर दिनांक-०९/०४/२०२० रोजी दुपारी ४:००वाजता छापा टाकुन टाकून एरंडोल पोलिसांकडून दारु जप्त करण्यात आली.
यावेळी त्याच्या ताब्यातील मुद्देमाल (वर्णन)-१) २०००/-रु.किंमतीचे दोन ड्रम (५० लिटर कच्चे रसायन) २)३०००/-रु. किंमतीचा एक पत्री ड्रम ( १०० लिटर उकळते पक्के रसायन) ३)५००/-रु. किंमतीची १० लिटर गावठी हातभट्टी ची तयार दारु व भट्टीची साधने एकुण ५,५००/- रू. किंमतीचा मुद्देमाल मिळुन
आल्याने विषयांकीत स्थळी धडक देत त्यास ताब्यात घेवुन त्याचेविरुध्द एरंडोल पोलिस स्टेशन ला प्रोव्ही.गुन्हा रजी.नंबर २७/२०२० महाराष्ट्र प्रोव्ही.कायदा कलम-६५ (ई),(फ),(ब),(क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एरंडोल पोलिस स्टेशन चे सहायक पोलिस निरीक्षक स्वप्निल उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड काॅन्स्टेबल चंद्रकांत पाटील, पोलिस नाईक राहुल बैसाणे, पोलिस काँन्सटेबल मिलिंद कुमावत यांनी कार्यवाही केली तसेच गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस नाईक राहुल बैसाणे हे करीत आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा