Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २८ फेब्रुवारी, २०२६

ब्रेकिंग न्यूज: शिरपूर पोलिसांची 'सिंघम' स्टाईल कारवाई! साताऱ्यातील २२ तोळे सोने लुटणारे ५ दरोडेखोर जेरबंद



शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास थरारक पाठलाग करून पोलिसांनी विना नंबरच्या स्विफ्ट कारसह ५ आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून २१ तोळे सोने हस्तगत करण्यात आले आहे.

📍 काय आहे नेमकी घटना?

दिनांक २७/०२/२०२६ रोजी मध्यरात्री सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रसिद्ध सोन्याचे व्यापारी श्री. कोमल परिहार यांच्यावर ५ अज्ञात दरोडेखोरांनी हल्ला करत २२ तोळे सोने लुटले होते. दरोडा टाकल्यानंतर आरोपी पांढऱ्या रंगाच्या विना नंबरच्या स्विफ्ट कारने वेगाने मध्यप्रदेशच्या दिशेने पळत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.

🚨 शिरपूर पोलिसांचा 'चक्रव्यूह' आणि थरारक पाठलाग

माहिती मिळताच शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पथक सतर्क झाले. पोलीस उपनिरीक्षक संदिप दरवडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने नाकाबंदी लावली. पोलिसांची नाकाबंदी पाहून आरोपींनी टोल नाका चुकवून शिरपूर गावातील अंतर्गत रस्त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला.
संशयीत कार दिसताच पोलिसांनी तिला थांबवण्याचा इशारा केला, मात्र आरोपींनी कारचा वेग वाढवला. अखेर पोलिसांनी जीवाची पर्वा न करता पाठलाग करून या दरोडेखोरांना चारी बाजूंनी घेरले आणि त्यांना बेड्या ठोकल्या.
⛓️ अटकेतील आरोपी (सर्व रा. ग्वाल्हेर, मध्यप्रदेश):
१. अभिषेक सुरेंद्र शिकलबार (वय १९)
२. अंकुश जाट (वय १९)
३. अनुज रामाधर दिवाकर (वय १९)
४. पंकज केदार राठोड (वय १९)
५. अजय फौजदार राठोड (वय २१)

👮 या 'जाँबाज' टीमने केली कारवाई:

या कारवाईत पो.उ.नि. संदिप दरवडे, पोहवा राजेंद्र रोकडे, रविंद्र आखडमल, पो.कॉ. योगेश दाभाडे, विनोद आखडमल, गोविंद कोळी, मनोज दाभाडे, प्रशांत पवार, मनोज महाजन, सचीन वाघ, भटु साळुंके आणि विजय पाटील या पथकाने अत्यंत धाडसी कामगिरी बजावली.
शिरपूर पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून सर्व स्तरांतून पोलिसांचे कौतुक होत आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध