Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २९ एप्रिल, २०२०
श्री दत्त छाया प्रतिष्ठान व राज कंस्ट्रक्शन तर्फे गरजूंना किराणा साहित्य वाटप
रावेर प्रतिनिधी जगभरात थैमान घातलेल्या कोरोना संसर्गामुळे सुरु असलेल्या संचारबंदी काळात रावेर तालुक्यातील खिरवड येथे श्री दत्त छाया प्रतिष्ठान व राज कंस्ट्रक्शन चे अध्यक्ष राजेंद्र पंढरीनाथ चौधरी यांच्या तर्फे गरजूंना जीवनावश्यक किरणा साहित्य तहसीलदार उशारणी देवगुणे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
देशात कोरोनाचा संसर्गामुळे संचारबंदी सुरु आहे. उद्योग, व्यवसाय बंद आहेत.
त्यामुळे गोर बरीब जनता व मजुरांना रोजगार मिळत नसल्याने व त्यांचे जवळील जीवनावश्यक खाद्य सामग्रीही संपण्याच्या स्थितीत आहे. गोर गरिबांवर उपासमारीची वेळ आल्याने त्यांची चूल सतत पेटत रहावी तसेच शासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत खिरवड येथील प्रतिष्ठीत शेतकरी, समाजसेवक, श्री दत्त छाया प्रतिष्ठान व श्री दत्तछाया तोल काटा व राज कंस्ट्रक्शन चे अध्यक्ष तथा माजी सरपंच ग्रा.पं. खिरवड, माजी चेअरमन रावेर तालुका खरेदी विक्री संघ तसेच रावेर पं.स. च्या माजी उपसभापती रेखाबाई चौधरी यांचे पती राजेंद्र पंढरीनाथ चौधरी यांच्या तर्फे गरजूंना जीवनावश्यक किरणा साहित्य वितरीत करण्यात आले.
तेल, साखर, चहा पावडर, मीठ, तूर डाळ, मुग डाळ, कांदे, मिरची पावडर, साबण आदी जीवनावश्यक किराणा साहित्याची पिशवी तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. यावेळी नायब तहसिलदार संजय तायडे, सर्कल टोंगळे, सरपंच व राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष निळकंठ चौधरी, उपसरपंच विनोद चौधरी, तलाठी राजेंद्र झामरे, ग्रामसेवक एच. डी. शिरसाठ, आरोग्य सेविका, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका आदी उपस्थित होते.
श्री. चौधरी यांच्या या सामाजिक कार्याबद्दल परिसरात त्यांचे कौतुक होत असून गोर गरिबांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा