Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २९ एप्रिल, २०२०
Home
/
Unlabelled
/
डायलिसिस आणि केमोथेरपी रुग्णांसाठी तात्काळ उपचारासाठी आज दि 29 पासून आमदार अनिल पाटील यांच्या कार्यालयात संपर्क साधावा.
डायलिसिस आणि केमोथेरपी रुग्णांसाठी तात्काळ उपचारासाठी आज दि 29 पासून आमदार अनिल पाटील यांच्या कार्यालयात संपर्क साधावा.
आमदार अनिल पाटील यांच्या मागणीवरून पालकमंत्रांनी साधला जिल्हा अधिक्षकांशी चर्चा
प्रतिनिधी अमळनेर डायलिसिस आणि केमोथेरपी रुग्णांसाठी तात्काळ उपचारासाठी आज दि 29 पासून आमदार अनिल पाटील यांच्या कार्यालयात संपर्क साधावा. असे आवाहन आमदार पाटील यांनी केले. यामुळे रुग्णांची फरफट थांबून तात्काळ पोलिसांकडून परवानगी मिळणार आहे.
आमदार अनिल पाटील यांनी बुधवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतलेल्या बैठकीत लॉक डाऊन व संचारबंदी काळात डायलिसिस केमोथेरपी व इतर अत्यवस्थ रुग्णांसह धुळे केवळ 35 किमी असून अथवा इतर ठिकाणी बाहेरगावी जाण्यासाठी
सुरवातीला आमदारांच्या सूचनेनुसार अनेक डायलिसिस रुग्णांना प्रांताधिकारी यांनी परवानग्या दिल्याने त्यांना सोईचे झाले परंतु अमळनेर येथे कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानंतर सीमा बंदी करण्यात आल्याने डायलिसिस रुग्णांना परवानगी मिळविताना मोठी अडचण येत असून यासाठी ऑनलाइन पद्धत असली तरी ती देखील वेळखाऊ आणि क्लिष्ट असल्याने अनेक रुग्णांची डायलिसिस तारीख टळत होती यामुळे त्यांच्या जीवास धोकाही निर्माण झाला होता,प्रत्यक्षात अनेक रुग्णांना आठवड्यातून किमान एकदा अथवा दोनदा डायलिसिससाठी धुळे अथवा नाशिक जावे लागत असते. त्यावर चर्चा होऊन तेथूनच पालकमंत्र्यांनी थेट पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा करून एक पोलीस अधिकारी नेमावा अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यानंतर तात्काळ कार्यवाही होऊन एक अधिकारी नेमला त्यात या पोलीस ठाण्यातील एपीआय एकनाथ ढोबळे यांची नेमणूक या परवानगी कामासाठी नेमण्यात आले आहे. आता रुग्णांनी थेट आमदार कार्यालयातील प्रवीण पाटील व ज्ञानेश्वर कुमावत व यांच्याकडे नोंदणी करण्याचे आमदार अनिल पाटील यांनी आवाहन केले असून आज दि 29 पासून आपली नोंदणी ताबडतोब कागदपत्रे घेऊन करावी असे आवाहन आमदार अनिल पाटील यांनी केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक ब्युरो चीफ कसबे वणी, ता. दिंडोरी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी अटकेत वणी पोलीस ठाणेस गुरनं ४३/२०२६ भा.न्या.सं. कलम ६४...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा