Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, ११ एप्रिल, २०२०

धुळ्यात आज कडकडीत बंद असून चौफेर नाकाबंदी करण्यात आली आहे.





धुळे प्रतिनिधी धुळे शहरात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाल्याने प्रशासनाने अधिक सक्त पावले उचलली आहेत. धुळ्यात आज कडकडीत बंद असून चौफेर नाकाबंदी करण्यात आली आहे. 

दिड दिवसांच्या शंभर टक्के लॉकडाऊन निर्णयाने प्रशासनाने प्रभावीपणे अंमल बजावणी केल्याचे आज दिसून आले.शहरातील गजबजलेले सर्वच रस्ते ओस पडले होते. एवढेच नव्हे तर मुख्य रस्त्यांपासून लांब असलेल्या कॉलन्यांमध्ये देखील शुकशुकाट होता. शहरातील साक्रीरोड, पाच कंदील, आग्रा रोड, मोलवीगंज अंशीं फुटी रोड, चाळीस गाव रोड, दत्त मंदिर चौक, नकाणे रोड यासह सर्वच भागात शांतता दिसून आली.

आजच्या लॉकडाऊनमध्ये भाजीपाला, किराणा दुकान,दुध या सेवांना देखील बंदी घातली गेल्याने धुळेकर बाहेरच पडले नाही.
आज खऱ्या अर्थाने शहरात संचारबंदी जाणवते आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध