मुख्याधिकारी अमोल बागूल यांच्या नेतृत्वाखाली विशेष मोहीम सुरू आहे.
शिरपूर प्रतिनिधी 'कोरोना'शी लढा देताना पालिकेकडे अचूक माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे संभाव्य परिस्थितीवर प्रभावी उपाययोजना करता येतील. त्यामुळे नागरिकांनी पालिकेच्या पथकाला बाहेरगावच्या आगंतुकांबाबत योग्य माहिती द्यावी. शहराच्या व स्वतःच्या आरोग्यासाठी सहकार्य करावे.
'स्कॅनिंग साठी १२ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य विभागाचे कर्मचारी, शिक्षक, स्वच्छता अभियानातील एजन्सीचे कर्मचारी, कर विभागाचे कर्मचारी यांचा पथकात समावेश आहे.गरज भासल्यास प्रत्येक पथकासोबत पोलिस देण्याची व्यवस्था आहे. ही पथके घराघरांत जाऊन बाहेरगावाहन आलेल्या व्यक्तीविषयी माहिती संकलित करीत आहेत.
अशा नागरिकांना 'होम क्वारंटाइन'चा शिक्का देऊन १४ दिवस घराबाहेर न पडण्याचे निर्देश देण्यात आले.आज अखेर पथकाने नव्या ४५० नागरिकांना होम क्वारंटाइन चे निर्देश दिले.
दोन दिवसांत मिळणार माहिती नगरपालिकेतर्फे नियुक्त पथकांनी शहरातील सर्व १६ हजार रहिवासी मालमत्ता तपासण्याचे लक्ष्य निश्चित
केले आहे. अत्यंत नियोजनपूर्वक व वेगाने सर्वेक्षण सुरू असल्याने दोन दिवसांत ते पूर्ण होईल. त्यानंतर होम क्वारंटाइन' झालेल्या नागरिकांची एकूण संख्या निश्चित होईल.
सर्वेक्षणादरम्यान सर्दी, खोकला, ताप आदी लक्षणांबावत माहिती विचारली
जात असल्याने संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी पालिकेकडे अचूक आकडेवारी उपलब्ध असणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा