Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १४ एप्रिल, २०२०

फेसबुकवर पत्रकारांची बदनामी करणाऱ्यावर कारवाई करा; बोदवड पोलिसांना पत्रकार संघाचे निवेदन




फेसबुकवर मुस्लिम समाजाची बदनामी करणार्यांवर कारवाई करा; नईम खान यांचे पोलिसांना निवेदन

 बोदवड:प्रतिनिधी भारतात सध्या कोरोना महामारी ने थैमान घातले आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र लॉक डाऊन असल्याने महाराष्ट्राला मोठे संकट आले आहे. व कायदा व सुव्यवस्था राखणे सर्वांची जबाबदारी असतांना बोदवड येथील अमोल शिरपूरकर याने फेसबुकवर पत्रकारांबद्दल अपशब्द वापरून प्रकारांची बदनामी करणारी पोस्ट केल्याने बोदवड पत्रकार संघाकडून या अमोल शिरपूरकर वर कारवाई करण्याचे निवेदन बोदवड पोलिसांना देण्यात आले. 

       
निवेदनात पत्रकार संघाचे संभाजी जाधव,निवृत्ती ढोले,अमोल आमोदकर,नितिन चव्हाण, पुरुषोत्तम गड्डम,गणेश पाटिल, गोपीचंद सुरवाड़े, रविन्द्र मराठे,अर्जुन आसने, सुहास बारी, संदीप वैष्णव, प्रकाश चौधरी यांच्या स्वाक्षरी होत्या.

      
याच अमोल शिरपुरकर ने फेसबुकवर मुस्लिम समाजाची बदनामी केली व दोन समाजात तेढ निर्माण करण्याची पोस्ट केलेली असल्याने अमोल शिरपूरकर याच्यावर कारवाई करावी अशी नईम खान बागवान यांनी बोदवड पोलिसात तक्रार केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध