Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १४ एप्रिल, २०२०
Home
/
Unlabelled
/
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेले कृषी उत्पन्न बाजार समितीतील धान्य मालाची खरेदी विक्री व्यवहार बूधवार दि १५ एप्रील २०२० पासून नियमित सुरू करावे असे आदेश जिल्हाधिकारींनी दिले आहे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेले कृषी उत्पन्न बाजार समितीतील धान्य मालाची खरेदी विक्री व्यवहार बूधवार दि १५ एप्रील २०२० पासून नियमित सुरू करावे असे आदेश जिल्हाधिकारींनी दिले आहे
अमळनेर प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेले कृषी उत्पन्न बाजार समितीतील धान्य मालाची खरेदी विक्री व्यवहार बूधवार दि १५ एप्रील २०२० पासून नियमित सुरू करावे असे आदेश जिल्हाधिकारींनी दिले आहे त्यामूळे गेल्या आठवड्यापासून बंद असलेली खरेदी विक्री व्यवहार आता पून्हा सूरू होणार आहे त्यामूळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे
अमळनेर बाजार समितीत रोख व चोख तसेच मालाला योग्य भाव मिळत असल्याने खान्देशातून मोठ्या प्रमाणावर आवक येते चार दिवसात सुमारे ३० हजार क्विंटलच्या मालाची विक्रमी आवक बाजार समितीत झाली होती मात्र वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर खरेदी विक्री व्यवहार जिल्हाधिकारींनी बंद केला होता.
शासनाच्या आदेशाचे पालन करून हि खरेदी सूरू होती शेतीचा माल पडून असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे हि बाब विधानपरिषद आमदार स्मिता वाघ यांनी जिल्हाधिकारींना लक्षात आणून दिली होती.
बाजार समिती सभापती प्रफुल्ल पवार यांनी व्यापारी सोबत तात्काळ मीटिंग घेतली व सोशल डिस्टन्सींग पाळावे तसेच एका वाहनावर चालक व मालक या दोन जणांनाच बाजार समितीत प्रवेश देण्यात येणार आहे.
यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे हा व्यवहार आता नियमित सुरू राहणार असल्याने शेतकरी वर्गाने घाई व गर्दी करू नये असे आवाहन सभापती प्रफुल्ल पवार व संचालक मंडळाने केले आहे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा