Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ४ मे, २०२०

शिरपूर तालुक्यातून बाहेर जाणारे व बाहेरून शिरपुरात येणाऱ्यांसाठी योग्य ते प्रयत्न सुरू - आमदार काशिराम पावरा



शिरपूर प्रतिनिधी शिरपूर शहर व तालुक्यातील रहिवासी असलेले विद्यार्थी, मजूर, कामगार तसेच इतर नागरिक यांना परराज्यातून व परजिल्ह्यातून शिरपूर येथे आणण्यासाठी पत्रव्यवहार करुन शासनाकडे देखील पाठपुरावा सुरु असल्याचे शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम पावरा यांनी माहिती दिली.

तसेच शिरपूर तालुक्यातून बाहेर त्यांच्या गावी बाहेर जाणारे मजूर, कामगार, पर्यटक, भाविक, विद्यार्थी व इतर व्यक्तींनी शासनाच्या धुळे जिल्हा वेबसाईटवर (http://dhule.gov.in) या लिंक वर संपूर्ण माहिती भरावी. सदर माहिती भरल्यानंतर संबंधीत जिल्हा, राज्यासोबत संपर्क साधण्यात येईल आणि त्या जिल्हा, राज्याशी समन्वय करुन प्रशासनामार्फत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. त्यामुळे आपण उपरोक्त लिंक वर आपली माहिती भरुन प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन आमदार काशिराम पावरा यांनी केले आहे.

अधिक माहिती साठी धुळे येथे 02562-288066, शिरपूर येथे आमदार काशिराम पावरा (9421534100), स्वीय सहाय्यक सचिन माळी (9552212999) यांच्या मोबाईल वर संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.

शिरपूर शहर व तालुक्यातील रहिवासी असलेले विद्यार्थी, मजूर, कामगार तसेच इतर नागरिक यांना परराज्यातून व परजिल्ह्यातून शिरपूर येथे आणण्यासाठी आजपर्यंत शासनाकडे पत्रव्यवहार सुरु आहे.

तसेच विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, आदिवासी विकास मंत्री ऍड. के. सी. पाडवी, जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा पोलिस अधिक्षक, शासनाकडे पाठपुरावा सुरु असल्याचे शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम पावरा यांनी सांगितले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध