Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ८ मे, २०२०
निसर्गाची काही प्रमाणात मिळाली साथ, आता अडचण उत्पादन विकण्याची...
जळगांव/मुंबई:भोईसमाज हा तसा भटकासमाज... हा समाज आपले कौशल्य आणि पारंपरिक व्यवसाच्या ज्ञानावर काही ठिकाणी पारंपरिक उत्पादन घेतांना दिसतो आहे त्यात म्हणजे राज्यातील विविध नदी तलाव आणि शेतीच्यापातळीवर खरबूज, काकडी, खिरा,टरबुजाचे उत्पादन घेतांना दिसतो आहे परंतु कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत तो अडचणीत सापडला आहे असे तरी दिसत आहे. आमच्या प्रतिनिधीशी जळगांव धुळे चंद्रपुर नांदेड जालना गडचिरोली या जिल्ह्यातील समाजघटकांनी बोलतांना सांगितले की, बाजारभाव किंवा मार्केट न मिळाल्याने हाताला काही फारसे लागले नाही असे सांगितले.
आधी अतिवृष्टीमुळे खरिप हातातून गेल्यानंतर आता रब्बीतही कोरोनाचे संकट उभे राहिले आहे आणि लॉकडाऊनमुळे शेतात मळ्यात मजूर येत नाही त्यामुळे माल काढता येत नाही आणि काढला तर तो विक्रीसाठी बाजारात नेण्यासाठी वाहन नाही आणि नेलाच बाजारात तर तो विकला जाईल याची कोणतीही हमी नाही.
खान्देशात, मराठवाड्यात, विदर्भात खरबूज टरबूज काकडी खिरे उत्पादक भोईसमाजाचे मोठे नुकसान झाले आहे. या संकटाच्या दृष्टचक्रातून कसे बाहेर पडता येईल या विषयावर ठीक ठिकाणी प्रयत्न चालू आहेत तसे आवाहन ही करण्यात येत आहे परंतु सरकारने आम्हाला ही काही प्रमाणात मदतीचा हातभार लावावा अशी अपेक्षा समाज घटक करत आहेत असेही स्थानिकांनी बोलतांना सांगितले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा