Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ७ मे, २०२०
कोरोना ब्रेकिंग जळगाव जिल्ह्यात आणखी दहा कोरोना बाधित रूग्ण आढळले
कोरोना बाधित रूग्णांची संख्या झाली शंभर
जळगाव, दि. 7 - जिल्ह्यातील अमळनेर व पाचोरा येथे स्वॅब घेतलेल्या 78 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आता नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी 68 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून दहा व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये पाचोरा येथील आंबेडकर नगर 21 वर्षीय तरूण, गिरडरोड येथील 49 वर्षीय पुरूष, आंतुर्ली येथील 50 वर्षीय पुरूष अशा तीन तर अमळनेर येथील आमलेशा नगरातील सहा व माळीवाडा येथील एक अशा सात व्यक्तींचा समावेश आहे.
निगेटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये पाचोरा येथील 16, भडगाव येथील एक व अमळनेर येथील एकावण्ण व्यक्तींचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 100 इतकी झाली असून त्यापैकी चौदा रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर तीन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा