Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ४ मे, २०२०
Home
/
Unlabelled
/
तळीरामांना खुशखबर रेड झोन मध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसोबत मद्याविक्री चा समावेश
तळीरामांना खुशखबर रेड झोन मध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसोबत मद्याविक्री चा समावेश
राज्य सरकारने आज ग्रीन, ऑरेंज झोनसह कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सील केलेला परिसर (हॉटस्पॉट) वगळता रेड झोनमध्ये जीवनावश्यक वस्तूच्या दुकानांसोबत रस्त्याच्या एका बाजूला असलेली इतर पाच दुकाने सुरू करण्याची परवानगी दिली. यात दारूच्या दुकानांचाही समावेश आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशभरासाठी तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाउन जाहीर झाले असून लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात केंद्र आणि राज्य शासनाने ग्रीन व ऑरेंज झोनमध्ये शिथिलता जाहीर केली आहे. राज्य सरकारने ऑरेंज व ग्रीन झोन तसेच सील केलेला परिसर वगळून रेड झोनमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसोबत रस्त्याच्या एका बाजूकडील स्वतंत्रपणे असलेली पाच दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या पाच दुकानांमध्ये मद्य विक्रीच्या दुकानाचा समावेश आहे ही दुकाने सुरू करताना खालील नियम पाळणे आवश्यक आहे
होलसेल मद्य विक्रीसाठी नियम
१) ग्रामीण भागातील सर्व घाऊक विक्रेते यांचे व्यवहार सुरू करण्यात येईल
२) शहरी भागात कंटन्मेंट झोन वगळून इतर भागांत घाऊक मद्य विक्रिस सायंकाळी 5 वाजेपर्यंत परवानगी
३) घाऊक विक्रेत्यांवर कोरोनासंदर्भातील सुरक्षेचे नियम लागू राहतील
४) दुकानदारांनी कामगारांची थर्मल स्क्रिनिंग करावी
५) कामगारास सर्दी, खोकला, ताप यासांरखे लक्षणे आढळ्यास त्यांना दुकानात प्रवेश देऊ नये
६) घाऊक विक्रेत्यांनी 50 टक्के मनुष्यबळावर काम करावे व सोशल डिस्टन्सिंग पाळावे
-------------------------------------
विदेशी शॉप, बियर शॉपी, देशी शॉप चे नियम
१) सिल बंद मद्य विक्री करण्यास परवानगी
२) ग्रामीण भागात मद्याचे दुकाने सुरू करता येतील.
३) शहरी भागात मॉल्स, बाजार संकुलातील व बाजारातील मद्य विक्री दुकानांस परवानगी नाही.
४) शहरात कंटेनमेंट झोन वगळून इतर ठिकाणी मद्य विक्रीस परवानगी.
५) सिल बंद मद्यविक्री करणाऱ्या दुकांनांसमोर एकावेळी पाच पेक्षा अधिक ग्राहक असू नये
६) दुकानांसमोर प्रत्येक सहा फुटांवर वर्तुळ आखून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.
७) दुकानदाराने सर्व कामगारांची थर्मल स्क्रिनींग करावी. ज्या कामगारास सर्दी, खोकला, ताप यासारखी लक्षण आहे त्यांना दुकानात प्रवेश देऊ नये.
८) दुकान व सभोवतालचा परिसर दर दोन तासाने निर्जंतुकीकरण करणे.
९) दुकानात येणाऱ्या ग्राहकांसाठी सॅनिटायझर मुबलक प्रमाणात असावे.
१०) मद्य विक्री सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरु राहिल.
-------------------------------------
मद्याच्या वाहतूकीस कोणताही अडथळा होणार नाही, वाहतूक सुरळीत होईल याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची राहील
दुकानदारास आवश्यकता असल्यास जिल्हा प्रशासन पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देईल
-------------------------------------
दुकाना समोर असे सुचना फलक बंधनकारक राहील
दुकानाच्या कामकाजाच्या सुधारीत वेळा
एका वेळी दुकानासमोर पाच पेक्षा अधिक व्यक्ती असु नये
सोशल डिस्टिंन्सिंग आणि मास्कचा वापर अनिवार्य.
दुकानात मद्य प्राशन करता येणार नाही
परिसरात थुंकण्यास सक्त मनाई आहे.
दुकानाकडून, ग्राहकांकडून नियम भंग झाल्यास त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई केली जाईल.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील तळवाडे येथे शिवरस्त्यावरील पाईपलाईन कामातून निघालेला मुरूम टाकण्याच्या कारणावरून मातंग व भिल्ल समाजातील नाग...
-
संदीप अवधूत :- वणी पोलीस ठाणेकडील गुन्हा रजिस्टर नंबर व कलम :-१३६/२०२६ बि.एन.एस. २०२३ चे कलम १०९ (१), ३५१(२) (३) ३५२ सह सस्त्र अधि.१९५९...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा