Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ११ जुलै, २०२०

रावेर तालुक्यात कृषी केंद्रांचा कळकळीत बंद..!



प्रतिनिधी रावेर अजीज शेख:येथे तालुकाभरासह राज्यभरात कृषी केंद्र चालकांचा राज्यव्यापी बंद असल्याने आज रावेर शहरासह तालुकाभरात दि.१०ते १२ जुलैपर्यंत कळकळीत बंद पाळण्यात आला.याबाबत आधी तहसीलदार उषाराणी देवगुणे यांना संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले.यावेळी तालुकाध्यक्ष सुनिल कोंडे,सचिव युवराज महाजन,खजिनदार डॉ जी एम बोंडे यांनी निवेदन दिले.

राज्यभरात कृषी केंद्र चालकांवर करण्यात आलेल्या विविध ठिकाणी झालेल्या नोंद गुन्ह्यांबाबत यावेळी निषेध करण्यात येऊन गुन्हे मागे घेण्याबाबत मागणी करण्यात आली.यावेळी जिल्हाध्यक्ष विनोद तराळ-पाटील यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध