Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २७ जुलै, २०२०
Home
/
Unlabelled
/
माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्या हस्ते जामनेर उपजिल्हा रुग्णालय येथे ऑक्सीजन प्रणालीचा शुभारंभ...!
माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्या हस्ते जामनेर उपजिल्हा रुग्णालय येथे ऑक्सीजन प्रणालीचा शुभारंभ...!
जामनेर:प्रतिनिधी:जामनेर तालुक्यातील कोरोना बाधीत रूग्णांना ऑक्सिजन साठी जळगांव नेण्याचीआता गरज भासणार नाही अशी महत्वपुर्ण माहिती माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांनी पत्रकारांना दिली.शहरातील उपजिल्हा रूग्णालयामधे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर ५० पाईपलाईनद्वारा ऑक्सीजन बेड प्रणालीच्या कक्षाचा शुभारंभ आ.महाजनांच्या हस्ते करण्यात आला.
याउपक्रमासाठी सुप्रीम पाईप कंपनीने आपल्या सि.एस.आर. मधुनही मोलाची मदत करण्यात आली. उपजिल्हा रूग्णालयात कोरोना रूग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विवीध सोयी-सुवीधांची माहिती देऊन शहरात लवकरच १०० बेडचे नॉनकोवीड सेंटर जिएम हॉस्पिटलच्या माध्यमातुनही
तालुकावासीयांना येत्या चार-पाच दिवसात सेवा मिळणार असल्याचेही आमदार गिरीश महाजनांकडुन सांगण्यात आले.
याप्रसंगी प्रान्ताधिकारी दिपमाला चौरे,तहसीलदार अरूण शेवाळे,नोडल अधिकारी डॉ विनय सोनवणे,डॉ आर के पाटील,डॉ हर्षल चांदा,डॉ प्रशांत महाजन,डॉ जयश्री पाटील, तालुका वैद्यकीय अधीकारी डॉ राजेश सोनवणे, पालीकेचे मुख्याधीकारी राहुल पाटील,पोलीसनिरीक्षक प्रताप इंगळे,आरोग्य सेवक अरवींद देशमुख आदी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा