Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १९ जुलै, २०२०
स्वाभिमानी शेगाव शहर वतीने डॉ. अण्णा भाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी..!
भारतीय साहित्याचे जनक,आंतरराष्ट्रीय कीर्तीचे साहित्यकार ,छत्रपती शिवरायांचा इतिहास साता समुद्रा पलीकडे नेणारे प्रथम शिवशाहीर,आपल्या लेखणीने शोषित, वंचित ,कामकरी ,कष्टकरी ह्यांचा संघर्ष मांडणारे दिन दुबळ्यांचे कैवारी, स्त्रियांच्या वेदना, त्यांची संघर्षमय जिवनगाथा त्यांचा परिस्थिती शी झुंज देण्याचा कणखरपणा आपल्या लेखणीद्वारे साकारणारे थोर साहित्यिक,मराठी भाषेची अस्मिता टिकवून ठेवणारे साहित्यसम्राट,आपल्या शाहिरीच्या माध्यमातून जनमानसात देशप्रेमाचे बीज पेरणारे खरे देशभक्त,कलापथकाच्या माध्यमातून जनजागृती करणारा खरा लोक कलावंत, ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून ती कामकर्यांच्या कष्टकऱ्यांच्या तळ हातावर तरलेली आहे असा महान संदेश देणारे विज्ञान वादी साहित्यिक,जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे,कामगारांच्या व्यथा ,त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या लेखणीस,त्यांच्या कार्यास,त्यांच्या विचारांस त्यांच्या पुण्यतिथी निमित्य स्वाभिमानी शेतकरी संघटना शेगाव वतीने पुण्यतिथी साजरी करण्यात आली या वेळेस स्वाभिमानी शेगाव शहर अध्यक्ष गोपाल तायडे,अतुल तायडे,आशिष बोरसे, सागर महेंगे, पवन दंदगाळ,कार्यकर्ते उपस्तित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा