Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १७ जुलै, २०२०

उस्मानाबादचा तरुण थेट पाकिस्तानला निघाला कथित प्रियसीला भेटण्यासाठी..!



उस्मानाबाद (राहूल शिंदे) दि.17 सोशल मीडिया वरून पाकिस्तानमधील एका मुलीशी ओळख झाल्यानंतर थेट पाकिस्तान मध्ये निघालेल्या उस्मानाबाद मधील 22 वर्षाच्या तरुणास सीमा सुरक्षा दलाने पाकिस्तान सीमेवर गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता पकडले आहे उस्मानाबाद पोलिसांची एक तुकडी या मुलाला ताब्यात घेण्यासाठी रवाना झाली आहे. 

मुलाच्या दाव्यात किती तथ्य आहे याचा शोध घेतला जाणार आहे झीशान सिद्दिकी असे या तरुणाचे नाव आहे उस्मानाबादच्या खाजानगर भागात राहणारा हा एक तरुण अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये (सेकंड ईयर) शिकत आहे त्याचे वडील उस्मानाबाद च्या एका मस्जिद मध्ये मौलाना आहेत. 

झीशान सिद्दिकी याची सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानमधील एका मुलीशी सोशल मीडियावरून ओळख झाली सोशल मीडिया (ॲप वरून) बोलत होते तिला भेटण्यासाठी हा तरुण निघाला असता सीमा सुरक्षा दलाने भारत-पाकिस्तान सीमेवर पकडले आहे विशेष म्हणजे तो आपल्या कथित प्रेमाला भेटायला दुचाकीवरून निघाला होता देशभरात कोरोनामुळे अनेक ठिकाणी लॉक डाऊन असताना तो तिथपर्यंत पोहोचलाच कसा हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत. 

आहे माहितीनुसार झीशान हा उस्मानाबादहुन अहमदनगर पर्यंत सायकल वर पोहचला अहमदनगर ते गुजरात मोटरसायकलवर पोहचला आणि मग पायी चालत सीमेच्या जवळ पोहचला गुजरात मधील कच्छ जवळ त्याला पकडण्यात आले त्याची दुचाकी वाळूमध्ये अडकल्यानंतर तो पायी चालत पाकिस्तानला जाणार होता सुरक्षा दलाला वाळूत आडकलेली एक दुचाकी सापडल्यानंतर त्यांनी शोध मोहीम सुरू केली यानंतर त्यांनी झिशानला ताब्यात घेतले त्यावेळी तो महाराष्ट्रातला असल्याचे स्पष्ट झाले उस्मानाबाद चा एक तरुण पाकिस्तान मध्ये निघाल्याची माहिती कळाल्यावर एटीएस सायबर औरंगाबाद.उस्मानाबाद.मुंबई टीम कार्यान्वित झाल्या उस्मानाबाद औरंगाबाद आणि मुंबई एटीएसने शोध घेतला त्याचा लॅपटॉप तपासला गेला तो पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात आहे. 

हे लक्षात आल्यावर सीमेवर कळवले होते उस्मानाबाद पोलिसांची एक तुकडी या मुलाला ताब्यात घेण्यासाठी रवाना झाली आहे मुलाच्या दाव्यात किती तथ्य आहे याचा शोध घेतला जाणार आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध