Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २५ जुलै, २०२०
Home
/
Unlabelled
/
अरे बापरे हे काय चक्क आशा स्वयंसेविकांना मासिक बैठकीला बोलावून..! प्राथमिक आरोग्य केंद्र तरवाडे परिसरातील काढायला लावले गवत..!
अरे बापरे हे काय चक्क आशा स्वयंसेविकांना मासिक बैठकीला बोलावून..! प्राथमिक आरोग्य केंद्र तरवाडे परिसरातील काढायला लावले गवत..!
जळगाव प्रतिनिधी:प्राथमिक आरोग्य केंद्र तरवाडे ता.चाळीसगाव जि.जळगाव अंर्तगत काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांना वैद्यकीय अधिकारी आज दि.२४ जुलै रोजी यांनी मासिक बैठकीच्या नावाखाली आरोग्य केंद्रात एकत्र बोलविले आणि स्वतः गैर अजर राहिले.संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांनी बैठक नुकतीच नावालाच घेत आलेल्या आशा स्वयंसेविकांना आरोग्य केंद्राच्या परिसरातील वाढलेले गवत काढायला लावले.
गवत काढण्यास आशा स्वयंसेविकांनी विरोध केला असता तुम्ही गवत न काढल्यास तुमचे ह्या महिन्याचा कामाचा मोबदला (मानधन) मिळणार नाही, अशी धमकी वैद्यकीय अधिकारी यांनी दिली. वैद्यकीय अधिकारी यांनी या प्रमाणे आशांकडून गवत काढण्याचे काम करून घेतल्यामुळे समाजात आशांची प्रतिमा खराब झाली आहे. परिणामी प्रचंड नाराजी पसरली आहे.
वास्तविक पाहता आरोग्य केंद्रात सफाई कर्मचारी असताना आशांकडून अशा प्रकारे धमकावून काम करून घेणे योग्य आहे का ?आरोग्य केंद्राचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आलेला निधी कुठे गेला ? कर्मचाऱ्यांना एकत्र बोलावून बैठक घेतल्यामुळे कोरोनाचा प्रसार झाल्यास जबाबदार कोण ? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे वैद्यकीय अधिकारी यांनी द्यावीत आणि वरिष्ठांनी याबाबत चौकशी करून वैद्यकीय अधिकारी यांच्या सह जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा