Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २ ऑगस्ट, २०२०
Home
/
Unlabelled
/
25 लाख रुपये किमतीचे पाच हजार रॅपिड अँटीजेन टेस्टिंग किट जामनेर तालुक्या साठी उपलब्ध करून देणार...!माजी मंत्री आ. गिरीश महाजन..!
25 लाख रुपये किमतीचे पाच हजार रॅपिड अँटीजेन टेस्टिंग किट जामनेर तालुक्या साठी उपलब्ध करून देणार...!माजी मंत्री आ. गिरीश महाजन..!
जामनेर (प्रतिनिधी) संजय सूर्यवंशी
पळसखेडा येथील प्रकाशचंद जैन महाविद्यालयांमध्ये सुरू असलेले 50 आणि आज 140 बेड असलेल्या कोविंड सेंटरचे उद्घाटन माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
त्याप्रसंगी 25 लाख रुपये किमतीचे पाच हजार रॅपिड अँटीजेन टेस्ट किट माझ्या फंडातून उपलब्ध करून देणार आहे. अशी माहिती आमदार गिरीश महाजन यांनी दिली. तसेच पहूर येथे ऑक्सिजन असलेले 30 व जामनेर उपजिल्हा रुग्णालय येथे 50 बेड रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. सर्वात जास्त ऑक्सिजन असलेले बेड मध्ये जामनेर तालुका हा पहिला आहे असेही महाजन म्हणाले या ऑक्सिजन बेडसाठी सुप्रीम कंपनीची आर्थिक मदत झालेली आहे तसेच पळसखेडा सेंटरसाठी कावडीया बंधूंची सुद्धा मदत झालेली आहे
आणि म्हणून आता जामनेर तालुक्यातील कोणत्याही रुग्णाला ऑक्सिजन साठी जळगाव जाण्याची गरज भासणार नाही. अशी व्यवस्था आपण जामनेर मध्ये केलेली आहे. सदर उद्घाटनप्रसंगी जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत, प्रांताधिकारी दीपमाला चौरे, तहसीलदार अरुण शेवाळे, नोडल अधिकारी डॉ. विनय सोनवणे, डॉ. आर के पाटील ,डॉ. हर्षल चांदा, पालिकेचे मुख्याधिकारी राहुल पाटील व आदी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संपादकीय :- राज्यात गाजत असलेल्या कथित शालार्थ आयडी प्रकरणाने आता केवळ काही व्यक्ती किंवा संस्थांपुरता मर्यादित प्रश्न राहिलेला नाही. उलट, य...
-
संदीप अवधूत :- शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांची संपूर्ण शारीरिक व कागदपत्रीय पडताळणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा