Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १ ऑगस्ट, २०२०
कृषी सहाय्यकाचे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन..!
परंडा (राहूल शिंदे) दि.31 तालुक्यातील चिंचपूर(बु) व परिसरात मोठ्या प्रमाणात या वर्षी लिंबू,संत्री,पेरू,चिक्कू,आंबा सिताफळ या फळ बागेची लागवड मोठ होत आहे.त्यासाठी योग्य व अभ्यासू मार्गदर्शन शेतकऱ्यांना आवश्यक होते.
शेतकरी वर्गाची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये.योग्य व तंत्रशुद्ध पद्धतीने फळबागेची लागवड व्हावी जेणेकरून शेतकऱ्यांना भविष्यात जास्तीत जास्त फायदा होईल, यासाठी श्री.देवकर साहेब हे कृषी सहाय्यक चिकल तुडवत थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फळ बागेची पाहणी करून योग्य व तंत्र शुध्द मार्गदर्शन करत आहेत.
त्याचबरोबरच सोयाबीन, उडीद,मूग,तूर यावर पडलेल्या रोगावर कोणत्या औषधांची फवारणी करणे आवश्यक आहे, याची शेतकऱ्यांना माहिती देत आहेत.शासनाच्या कृषी योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचवत आहेत.
या अनमोल मार्गदर्शनामुळे शेतकरी समाधानी असून मनापासून आभार मानत आहे.
खरोखरच कृषी सहाय्यक कसा असावा व त्यांच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत काय जबाबदारी असावी याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच देवकर साहेब हे होय.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांची संपूर्ण शारीरिक व कागदपत्रीय पडताळणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील ...
-
नंदुरबार, प्रतिनिधी : नंदुरबार शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या मुख्य शाखेजवळ बुधवारी सायंकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा