Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २८ सप्टेंबर, २०२०
एमएचटी-सीईटी 2020 राज्य सामाईक परीक्षेसाठी, एस.टी.बसेस उपलब्ध होणार ! !
उस्मानाबाद (राहुल शिंदे)दि.28:-महाराष्ट्र विना अनुदानित खाजगी व्यवसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन) अधिनियम, 2015 मधील तरतुदीनुसार शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी शासकीय,शासन अनुदानित आणि खाजगी विनानुदानित महाविद्यालयांच्या अभियांत्रिकी,औषधनिर्माणशास्त्र व कृषी तंत्रज्ञान विभागातील प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश सामाईक प्रवेश परीक्षेद्वारे (एमएचटी-सीईटी) -2020 राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष,महाराष्ट्र राज्य मुंबई यांचेमार्फत घेण्यात येणार आहे.
या प्रवेश परीक्षा दि.01 ऑक्टोंबर 2020 ते 20 ऑक्टोबर 2020 या कालावधीत दोन सत्रांमध्ये राज्यांतील 36 जिल्हयांमधील 180 विविध परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे.यावर्षी सदर परिक्षेला अंदाजे 5 लाख 41 हजार विद्यार्थी बसणार आहेत.
शैक्षणिक वर्ष 2020-21 करिता,दि. 01 ऑक्टोंबर 2020 ते 20 ऑक्टोबर 2020 या कालावधीत घेण्यात येणा-या एमएचटी-सीईटी 2020 या प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाणे सुलभ व्हावे. यादृष्टने उस्मानाबाद विभागातील आगारातून मागणीनुसार /आवश्यकतेनुसार उमेदवारांना बसेस उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे विभाग नियंत्रक राज्य परिवहन महामंडळ, उस्मानाबाद यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविलेआहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा