Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ३ सप्टेंबर, २०२०

सामाजिकसंस्था तथा प्रशासनच्या आव्हनाला शेगांवकरांचा चांगला प्रतिसाद..! २५०-३०० घरगुती गणपतिचे विसर्जन शेगांवकरांचा चांगला प्रतिसाद



शेगांव( प्रतिनिधी उमेश राजगुरे)
रोटरी क्लब शेगांव, पोलिस प्रशासन आणि नगर परिषद शेगांव यांच्या आव्हानाला शेगांव कारांनी चांगला प्रतिसाद देत जवळ पास २५०-३०० गणेश मूर्तिचे विसर्जन सामूहिक रित्या संपूर्ण विधि सह लोहारा येथील नदी पात्रात भक्तिभावाने विसर्जन  करण्यात आले. 

रोटरी क्लब शेगांव, पोलिस स्टेशन शेगांव आणि नगर परिषद शेगांव यांच्या संयुक्त विद्यमाने शेगांव शहरातील गणेश भक्तानां कोरोना च्या पार्श्वभूमी वर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आप आपल्या घराचे गणपति मूर्ति गांधी चौक,अग्रसेन चौक आणि शिवनेरी चौक येथे आणून द्यावी असे सांगण्यात आले होते शेगांव कारांनी खुप चांगला प्रतिसाद देऊन  गणेश मूर्ति या 3 ठिकाणी  संकलीत करण्यात आले. त्याच बरोबर पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून निर्माल्य सुद्धा संकलन करण्यात आले.
गणपति बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा जय घोष करून बाप्पाला निरोप देत एकच आर्त हाक करण्यात आली  की या वैश्विक महामारी कोरोना पासून आम्हा सर्वांची लवकरात लवकर सुटका होऊ दे आणि सर्वाना सुखी,निरोगी आयुष्य प्रदान कर अशी विनवणी करण्यात आली. 

रोटरी क्लब चे अध्यक्ष अनिरुद्ध पालडीवाल, सचिव सचिन गाड़ोदिया, प्रोजेक्ट डायरेक्टर धीरज टिबड़ेवाल, आशीष दिवानका, अभिषेक अग्रवाल, व सदस्य डॉ अभय गोयनका, भारत खत्री, आनंद पालड़ीवाल, योगेश जयपुरिया  तसेच रोट्रेक्ट क्लब चे सदस्य ,शेगाव पुलिस स्टेशन चे ठाणेदार संतोष टाले व कर्मचारी,नगर परिषद चे कर्मचारी यांची या वेळी उपस्थिती होती. अशी माहिती रोटरी क्लब शेगांव चे सचिव सचिन गाड़ोदिया यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध