Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ३ सप्टेंबर, २०२०
मोटर सायकल व बैलगाडीमधे अपघात;अंदाजे ४० वर्षीय इसम जागीच ठार...!
शेगाव(प्रतिनिधी उमेश राजगुरे) शेगाव जलंब येथून घराकडे परतत असताना मोटरसायकल क्रं एम एच ३० ए वाय ७५१८ चालकाचा अपघात होऊन जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना दुपारी तीन ते चार वाजताच्या दरम्यान घडली आहे.
अतुल डोमाजी नेमाडे असे त्याचे नाव असून राहणार पोही तालुका मूर्तिजापुर जिल्हा अकोला वय अंदाजे चाळीस वर्ष हा इसम मोटर सायकल चालवत त्याच्या अमोल गजानन आंबीलकर वय 26 या सहकाऱ्यासह घरी जात असताना खेरडा गावाच्या बाहेर शेतातून वळण रस्त्यावर अचानक बैलगाडी आली मोटरसायकल समोरून आल्याने बैलं हे दचकुन रस्त्यामध्ये आडवे झाल्याने मोटरसायकल चालकाची बैलगाडीला जबर धडक लागल्याने मोटरसायकल चालकाचा गंभीर जखमी होऊन जागेवरच मृत्यू झाला.
पाठीमागे बसलेल्या सहकाऱ्याचे दैव बलवत्तर त्यांच्या अंगावरुन बैलगाडीचे चाक गेले मात्र त्याला काही इजा नाही. अपघात मृत्यू झालेल्या इसमाला शवविच्छेदनासाठी सईबाई मोटे सामान्य रुग्णालय शेगाव येथे आणण्यात आले होते तर जलंब पोलीस स्टेशन अंतर्गत पुढील प्रक्रिया पोलीस हे करत आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा