बळी शेम नांदेड नगरी शौर्य बाळा तुला बाबा वाचवू शकले नाहीत... दोष त्यांचा नाही रे.. दोष समाजातील मानसिकतेचा आणि गलिच्छ राजकारणाच्या व्यवस्थेचा आहे.
ज्या देशांमध्ये आपण महासत्तेचे आणि स्मार्ट सिटी चे स्वप्न बघू पाहत आहोत, त्याच देशामध्ये वैद्यकीय सेवांचा असा बाजार मांडला आहे की, देहाला किंमतच उरली नाही. लाखो रुपये खर्च करून सुद्धा, जर योग्य वैद्यकीय सुविधा मिळत नसतील तर दोष नियतीला देऊन काय उपयोग? राजकारणाच्या गलिच्छ पातळीवर जाणाऱ्या नेत्यांनी जरा शहरातील वैद्यकीय सुविधांना प्राधान्य दिले असते तर, आज ही अवस्था हजारो लोकांवर आलीच नसती.
नांदेड सारख्या शहरातील सरकारी हॉस्पिटल मध्ये फक्त एक व्हेंटिलेटर आहे यापेक्षा दुर्देवी कोणतीच गोष्ट नाही. हॉस्पिटलची नावे बदलल्याने तेथील व्यवस्था व वैद्यकीय सेवा ही सोयीस्कर होईलच असे नाही. जी आंदोलने हॉस्पिटलचे नाव बदलण्यासाठी होतात तीच आंदोलने जर हॉस्पिटल मधील व्यवस्था बदलण्यासाठी झाले असते तर आज या महामारी मध्ये लाखो लोकांना पैसे असून सुद्धा आपल्या लोकांचा जीव गमवावा लागला नसता.
शौर्य दोन वर्षाचा चिमुकला... लहानपणापासून शरीर साथ देत नसल्याने, वेळोवेळी आजारी पडत असल्याने, कित्येक वेळा घरच्यांनी हॉस्पिटलचे उंबरठे झिजवले. लाखो रुपये खर्च केले पण आपल्या बाळाला काही होऊ दिले नाही. याच महामारी मध्ये सुद्धा त्यांनी कुठेही हार मानली नाही. हैदराबाद सारख्या वैद्यकीय सेवांच्या प्रसिद्ध अशा चांगल्या ठिकाणी विलाज चालू ठेवला. आपले बाळ ठणठणीत होईपर्यंत त्यांनी हॉस्पिटलचा उंबरठा सोडला नाही.
शौर्य चांगला ठणठणीत बरा झाल्यानंतर, आपल्या घरी आल्यावर सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंदात असणार. या आनंदाला जास्त काळ घेता आला नाही, आठ दिवसांमध्येच परत शौर्य ची तब्येत बिघडत असल्याकारणाने त्यांना परत नांदेड येथील शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयामध्ये हलविण्यात आले. तिथे शौर्याची कोरोना टेस्ट सुद्धा घेण्यात आली. ती टेस्ट निगेटिव्ह येणे सहाजिकच होत. शासकीय रुग्णालयांमध्ये फक्त एक व्हेंटिलेटर उपलब्ध आहे. ते व्हेंटिलेटर शौर्य साठी उपलब्ध करून देता येत नसल्यामुळे... शौर्य ला खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी डॉक्टरांनी सल्ला दिला. तो सल्ला मान्य करून नांदेड मधील, कित्येक नामवंत हॉस्पिटलचे दरवाजे ठोठावण्यात आले. पण एकाही खाजगी रुग्णालयांमध्ये शौर्य ला घेण्यात आले नाही. शौर्य चा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असतानासुद्धा अशा प्रकारची वेळ येणे म्हणजे खरंच माणुसकीला काळीमा फासण्या सारखे आहे.
ज्या शासकीय रुग्णालयांमध्ये आपात्कालीन वेळी शोर्य ला वेंटिलेटर ठेवण्यात आले, ती व्हेंटिलेटर किती कोरणा रूग्णांना वापरण्यात आले असावे. आणि या चिमुकल्याला कोरोना हा रोग नसतानासुद्धा त्या बेडवर झोपावे लागले. खरंच किती विदारक आणि भयानक अर्धसत्य आहे.
खाजगी रुग्णालयांमध्ये वेंटिलेटर उपलब्ध आहेत.... अशी प्रतिक्रिया पालक मंत्री अशोकराव चव्हाण यांनी दिली होती. व्हेंटिलेटर जर कमी पडत असतील तर, काही रुग्णांना मुंबईसारख्या ठिकाणी हलविण्यात येईल असे सांगण्यात आले. म्हणजे आपत्कालीन वेळेस रुग्णांना वेंटिलेटर उपलब्ध होणार हे आपण नाकारणार नाही. शौर्याच्या नातेवाईकांनी खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी पैशाची कमतरता दाखवलीच नाही. लाखो रुपये देण्यासाठी तेही तत्पर होते. यामध्ये दोष कोणाचा? हे शोधत बसण्यापेक्षा याचा अंदाज लावायला हवा की दररोज अशी वेळ शेकडो लोकांवर येत आहे.
त्या दोन वर्षाच्या शौर्याला वाचवण्या मध्ये त्याच्या बाबांना यश आले नाही, याची खंत त्यांना आयुष्यभर सतावणार नाही का? त्या चिमुकल्याला तेव्हाच यश आले जेव्हा या चिमुकल्यांनी आपला जीव सोडला.
अहो एखादी स्मार्ट सिटी कमी करा.... एखादे दोन पुतळे हे जरा कमी बांधा... पण एखादी हॉस्पिटल सिटी तरी उभारा, म्हणजे भविष्यात येणारा कोणताही रोग हा देशातील लोकांना हरवू शकणार नाही. नाहीतर राजकारणाच्या गलिच्छ पातळीमुळे या देशाला भविष्यामध्ये महासत्ता नाही पण महाराख झाल्याशिवाय कोणी वाचू शकणार नाही. समाज, जा धर्मपंथ देवधर्म या गोष्टींना जेवढे महत्त्व दिले जाते तेवढेच महत्त्व जर वैद्यकीय सेवांना दिले तर नक्कीच हे न दिसणारे देवधर्म सुद्धा आपल्याला पावतील.
हे सर्व चालत राहणार पण एका चिमुकल्या ने गलिच्छ व्यवस्थेला हरून आपला प्राण गमावला ही खंत आयुष्यभर नांदेड नगरीला दोष देत राहणार.
- शौर्य हणमंत मस्कले
रा.रूई या.कंधार जि.नांदेड या चिमुकल्याचा आरोग्यसुविधांच्या अभावामुळे बळी गेला.
भावपूर्ण श्रध्दांजली बाळा....
लेखन :- सूरज योगीराज जावळे
संकलन:- राहूल शिंदे, विभागीय संपादक दै.तरुण गर्जना न्युज(9975114800)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा