Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २४ ऑक्टोबर, २०२०

शहादा तालुक्यातील सारंखेडा येथे आदिवासी युवतीच्या खून प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा करण्याची आदिवासी संघटनांची मागणी...!



शहादा तालुक्यातील सारंगखेडा गावात प्रेम प्रकरणातून पंधरा वर्षे मुलीची झालेल्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ आज विविध आदिवासी संघटना आक्रमक झाल्याचे पहावयास मिळाले आहे. 

शहादा तालुक्यातील तहसील कार्यालय समोर आज आदिवासी संघटनेचे युवकांनी एकत्र येत घटनेतील आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी केली. यावेळी आदिवासी समाजावर होत असलेल्या अत्याचारां विरोधात युवकांनी जोरदार घोषणाबाजी केली. 

तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांना या सगळ्या घटनेप्रकरणी निवेदन देऊन कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. रावेर मधील आदिवासी समाजाच्या चार मुलांच्या हत्येची घटना ताजी असतानाच सारंखेडा येथे आदिवासी अल्पवयीन मुलीची हत्या झाल्याने समाजातून याबाबत रोष व्यक्त केला जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध